*कन्हान येथे उपविभागीय शांती समितिची बैठक संपन्न* *परिसरात शांतता राखुन उत्सव साजरा करा व दिलेल्या आदेशांचे पालन करा पोलीस अधिक्षकांचे नागरिकांना आव्हाहन*

*कन्हान येथे उपविभागीय शांती समितिची बैठक संपन्न*

*परिसरात शांतता राखुन उत्सव साजरा करा व दिलेल्या आदेशांचे पालन करा पोलीस अधिक्षकांचे नागरिकांना आव्हाहन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरात रमजान ईद , रामनवमी , डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती , व हनुमान जयंती सह आदि सण उत्सव निमित्य उपविभागीय शांती समिति च्या बैठकी चे आयोजन डोणेकर सभागृह येथे करण्यात आले असुन या बैठकी मध्ये प्रामुख्याने उपस्थित नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी नागरिकांना मार्गदर्शन करीत परिसरात शांतता राखुन उत्सव साजरा करण्याचे आव्हाहन व पोलीस प्रशासना कडुन
दिलेल्या आदेशांचे पालन करण्याचे आव्हाहन पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी नागरिकांना केले आहे .
कन्हान , मौदा व खापरखेडा परिसरात रमजान ईद , रामनवमी , डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती , व हनुमान जयंती सह आदि सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो परंतु मागील दोन वर्ष कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने राज्य शासना ने नियमावली लागु केल्याने नागरिकांनी शासना च्या नियमाचे पालन करुन सण उत्सव आपल्या घरीच व परिसरात मोजक्यात साजरा केला असुन ह्या वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रणात असुन शासनाने १ एप्रिल २०२२ पासुन कोरोना काळातील नियमावली हटविल्याने नागरिकांन मध्ये येणाऱ्या सणांचा उत्साह पाहायला मिळत असुन या रामनवमी , डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व हनुमान जयंती सह आदि विविध सण उत्सव येत असल्याने कन्हान , मौदा व खापरखेडा शहरात व परिसरात शांती सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री विजयकुमार मगर यांच्या आदेशानुसार कन्हान डोणेकर सभागृह येथे उपविभागीय शांती समिति च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकी मध्ये प्रामुख्याने उपस्थित नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर व वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी नागरिकांना मार्गदर्शन करीत परिसरात शांतता राखुन उत्सव साजरा करण्याचे आव्हाहन व पोलीस प्रशासना कडुन दिलेल्या आदेशांचे पालन करण्याचे आव्हाहन नागरिकांना केले आहे .


यावेळी सामाजिक , राजकीय पदाधिकार्यांनी पोलीस अधिक्षक श्री विजयकुमार मगर यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन व शहरातील विविध समस्या बाबत चे निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे .


या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान , कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे , मौदा पोलीस निरीक्षक हेमंत खराबे , खापरखेड़ा पोलीस निरीक्षक हद्यनारायण यादव , कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक राजेश यादव , मनिष भिवगडे , योगेंद्र रंगारी , विनायक वाघधरे , सतीश संभालकर , निखिल रामटेके , भुषण इंगोले , राजेंद्र शेंदरे , वर्धराज पिल्ले , मोतीराम रहाटे , कमलसिंह यादव , ऋषभ बावनकर , मालवीय सर , अकरम कुरैशी , शरद डोणेकर , दयाराम भोयर , रिंकेश चवरे , शैलेश शेळके , मयुर माटे , अभिजीत चांदुरकर , प्रशांत मसार , नरेंद्र वाघमारे , संजय सत्येकार , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …