*कन्हान – कांद्री येथे नागपुर ते रामटेक पायदळ वारीचे भव्य स्वागत*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – सर्वश्री वारकरी सांप्रदाय सेवा समिती व्दारे श्री राम नवमी निमित्य श्री संत ज्ञानेश्वर मंदीर जुनी मंगळवारी नागपुर ते श्री क्षेत्र रामटेक पायदळ वारी दिंडी सोहळा कन्हान-कांद्री येथे आगमण होताच तेली समाज कन्हान कांद्री द्वारे व भक्तांनी फुलाच्या वर्षाने जोरदार स्वागत केले व रात्री भजन, कीर्तन, भोजन व मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी कांद्री, बोरडा रोड निमखेडा मार्ग रामटेक करिता प्रस्थान करण्यात आले .
श्री राम नवमी निमित्य सर्वश्री वारकरी सांप्रदाय सेवा समिती व्दारे गुरूवार (ता.७) रोजी ते सोमवार (ता.११) एप्रिल रोजी पर्यंत श्री संत ज्ञानेश्वर मंदीर जुनी मंगळवारी नागपुर ते श्री क्षेत्र रामटेक पायदळ वारी दिंडी सोहळाचे आयोजन करून गुरूवार (ता.७) एप्रिल ला सकाळी ७ वा. श्री संत ज्ञानेश्वर मंदीर जुनी मंगळवारी नागपुर अभिषेक, पुजन करून पायदळ वारी दिंडी सोहळयाची सुरूवात होऊन सायं. ७ वा. भवानी माता मंदीर पारडी नागपुर येथे भजन, किर्तन, भोजन व मुक्काम करण्यात आले. शुक्रवार (ता.८) सकाळी ६ वाजता पारडी येथुन प्रस्थान करून भरतवाडा येथे प्रसाद घेऊन सकाळी १० वाजता कामठी मढी दुर्गा मंदीर घोरपड येथे जेवन सायं. ५ वाजता साई मंदीर कामठी-कन्हान येथे चहापाणी घेऊन सायं. ६ वाजता कन्हान नगरीत आगमन होताच तेली समाज कन्हान कांद्री येथे भाविकांकडून फुलाच्या वर्षावाने जोरदार स्वागत करुन श्री संताजी स्मृती सभागृह कन्हान-कांद्री येथे भजन, किर्तन, भोजन व रात्री मुक्काम करून शनिवार ,(ता. ९) एप्रिल ला सकाळी ६ वाजता कांद्री, बोरडा रोड निमखेडा मार्ग रामटेक करिता प्रस्थान करण्यात आले .
या प्रसंगी शरद डोणेकर, अशोक हिंगणकर, वामन देशमुख, कृषणराव सराटकर, पुरुषोत्तम बेले, मनोहर कोल्हे, वदिनीकांत गिरडकर, देवचंद कुंभलकर, सुनिल सरोदे, चंन्द्रशेखर बावनकुळे, शिवाजी चकोले, राजेश पोटभरे, प्रमोद माहुरे, अल्का कोल्हे, मंगला हटवार, कल्पना देशमुख , अपुर्वा हिंगणकर , रमेश हजारे , अग्रवाल, विकास मेहर, ओमदास लाडे, सुरेश आंबागडे, अनुराग महल्ले, सह आदि नागरिक मोठ्या संख्येत राहून सहकार्य केले .