*कन्हान येथे श्रीराम नवमी महोत्सव थाटात संपन्न* *शहरात बाईक रैली चे आयोजन*

*कन्हान येथे श्रीराम नवमी महोत्सव थाटात संपन्न*

*शहरात बाईक रैली चे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरात आणि परिसरातील ग्रामिण भागात विविध संघटनेच्या वतीने श्रीराम नवमी महोत्सव निमित्य ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन व मिरवणूक काढून श्रीराम नवमी महोत्सव थाटात पार पाडला.


शहरातील नगर परिषद समोर जय श्री राम सेवा समिति मित्र परिवार च्या वतीने श्रीराम नवमी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात श्रीराम यांच्या प्रतिमेचे पुजन करुन नागरिकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले तसेच सात नंबर नाका येथे अशोक कार डेकोरेटर व राजा यादव मित्र परिवार च्या वतीने कार्यक्रम आयोजित करून श्रीराम यांच्या प्रतिमेचे पुजन व महाप्रसाद वितरण करण्यात आले.
त्याचप्रमाणे सायंकाळी च्या सुमारास शिवसेना मित्र परिवार द्वारे पटेल नगर येथे श्रीराम यांच्या प्रतिमेचे पुजन करुन डी.जेच्या गजरात नाचत गाचत मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक पिपरी , शिवाजी नगर, आंबेडकर चौक, गहुहिवरा चौक, तारसा चौक , सात नंबर नाका होत परत महामार्ग ने गांधी चौक येथे मिरवणुकी चे समापन करण्यात आले .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …