*कन्हान परिसरात महात्मा ज्योतिबा फुले यांची १९५ वी जयंती थाटात साजरी*
*आदर्श हायस्कुल कन्हान व येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान परिसरातील आदर्श हायस्कुल व येसंबा ग्रामपंचायत येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची १९५ वी जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
*आदर्श हायस्कुल , कन्हान*
कन्हान येथील आदर्श हायस्कुल च्या प्रांगणात महात्मा ज्योतिबा फुले यांची १९५ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे सचिव भरत सावळे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी आदर्श हायस्कुल च्या मुख्याध्यापिका सी एन मेश्राम यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करुन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर माहिती दिली असुन कार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षकांनी व विद्यार्थांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी सर्व शिक्षक , शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
*येसंबा ग्रामपंचायत , कन्हान*
येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची १९५ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी व अधिकार्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या वनिता राऊत , भारती वाघमारे , समाजसेविका हिराताई चकोले , गामाजी चकोले , प्राची चकोले , येसु चकोले , ग्रामपंचायत कर्मचारी संजयजी गजभिये सह आदि नागरिक उपस्थित होते .