*कन्हान परिसरात चैत्र नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात संपन्न*
*विविध मातेचा मंदिरात , भजन , कीर्तन , महाप्रसाद सह विविध कार्यक्रम संपन्न*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात व परिसरात चैत्र नवरात्र महोत्सव निमित्य विविध मातेच्या मंदिरात घटस्थापना करुन सतत ने पुजा पाठ , भजन कीर्तन , व महाप्रसाद वितरण करुन चैत्र नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात संपन्न करण्यात आले.
*सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी*
सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी च्या वतीने चैत्र नवरात्र महोत्सव निमित्य दुर्गा मंदिर येथे घटस्थापना करणात आले असुन दररोज पुजापाठ , महाआरती , भजन , कीर्तन, गायन करीत अष्टमी नवमी च्या दिवशी हवनयज्ञ करुन महाप्रसाद वितरण करण्यात आले व घटविसर्जन कन्हान नदी च्या पवित्र पाण्याचा पात्रात विसर्जित करुन चैत्र नवरात्र चे समापन करण्यात आले .
या प्रसंगी केशरीचंदजी खंगारे , राधेश्याम भोयर , प्रशांत मसार , रवि अजबले , अजाबराव कडनाएके , देवाजी येलमुले , चंद्रभान चौधरी , सुधाकर तिवाडे , संजय खडसे , महेश मेश्राम , दिलीप येलमुले , पुषा खंगारे , ज्योती येलमुले , कल्पना खंगारे , दुर्गा कोरवते , वनिता मसार , वर्षा रामगुंडे , तारा ठाकरे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
*जय शितला माता मंदिर , कांद्री कन्हान*
जय शितला माता मंदिर कांद्री कन्हान येथे दिनांक २ एप्रिल ला चैत्र नवरात्र च्या दिवशी विधिवत पूजा अर्चना करून पंडित अरविंद पांडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रकाश ढोके , वसंता राऊत , प्रेमचंद चव्हान , गुड्डु यादव , बादल विश्वकर्मा यांच्या हस्ते घटस्थापना करुन चैत्र नवरात्र ची सुरवात करण्यात आली असता मंदिरात दररोज पुजापाठ , महाआरती , भजन , कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . रविवार दिनांक १० ला श्रीराम नवमी च्या दिवशी जय शितला माता मंदिरात
शितला माता महिला भजन मंडळ , जस मंडळ संताजी नगर कांद्री सह करुना नाईक , मंजु शर्मा , प्रिती पांडे , कुसुम सरणकर , सुषमा चोरे , बबली सिंग , सविता यादव , मिरा यादव , पिंकी देशमुख , मिना पाल सह आदि महिलांनी भजन कीर्तनाचे गायन केले . त्यानंतर प्रकाश ढोके , वसंता राऊत यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करून , होम , आरती , प्रसाद वाटप करण्यात आले असुन रात्री महाप्रसाद वितरण करुण चैत्र नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात संपन्न करण्यात आला .
कार्यक्रमाचे आयोजन दिलीप मरबडे , संजय चौकसे , वामन देशमुख , प्रितेश मेश्राम , ओमदास लाडे , चंद्रशेखर बावनकुळे , परमेश्वर नांदुरकर , गोकुल पटेल , पुरुषोत्तम रक्षक , रामचंद्र राऊत , अरविंद मोहनकर , किशोर सोमकुवर , सुरेश आंबागडे , किशोर बावने सह आदि नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन सहकार्य केले .
*माँ जगदंबा सेवा समिती , कन्हान*
माँ जगदंबा सेवा समिती मंदिर कन्हान येथे चैत्र नवरात्र निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . २ एप्रिल चैत्र नवरात्र च्या दिवशी मंदिरात विधिवत पुजा अर्चना करुन घटस्थापना करणात आली असता दररोज पुजापाठ , महाआरती , भजन कीर्तन , कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . रविवार दिनांक १० एप्रिल ला श्रीराम नवमी च्या दिवशी मंदिरात विधिवत पूजा अर्चना करून , हवनयज्ञ करुन व परिसरात महाप्रसाद वितरण करुन चैत्र नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी सुनील लाडेकर , चम्म्पालाल छलिया , गजानन राठी , मुरलीधर नानोटे , अनिल भान्द्क्कर सह आदि नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन सहकार्य केले .
*राजेश्वरी मंदिर कमेठी , धरम नगर , कन्हान*
राजेश्वरी मंदिर कमेठी धरम नगर कन्हान येथे चैत्र नवरात्र निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मंदिरात चैत्र नवरात्र च्या दिवशी विधिवत पुजापाठ करुन घटस्थापना करणात आली होती . त्यानंतर जम भजन रामकृष्ण हरी भजन मंडळ रायनगर कन्हान द्वारे सौ रंजना सरोदे , विजय सुर्यवंशी , विनायक सरोदे , ईश्वर बोरकर , शंकर यांच्या सह कार्याने भजन कीर्तन कार्यक्रम संपन्न झाले .
श्रीराम नवमी च्या दिवशी मंदिरात विधिवत पूजा अर्चना , हवनयज्ञ करुन व महाप्रसाद वितरण करुन चैत्र नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात संपन्न करण्यात आला .