*सावनेर तहसील कार्यालयात डॉ. बाबासाहेबांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी* *पशुसंवर्धन,दुग्धविकास,क्रिडा व यचवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे हस्ते 26 लाभार्थ्यांना 57 लाखाच्या सानुग्रह अनुदानाचे वाटप*

*सावनेर तहसील कार्यालयात डॉ. बाबासाहेबांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी*

*पशुसंवर्धन,दुग्धविकास,क्रिडा व यचवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे हस्ते 26 लाभार्थ्यांना 57 लाखाच्या सानुग्रह अनुदानाचे वाटप*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित,शोषित, पीडीत, गरीब, दीनदुबळे आणि सर्व स्तरातील जनतेसाठी अहोरात्र कार्य केले. समाजहिताचे कार्य करतांना त्यांनी कधीही भेदाभेद केला नाही. त्यांची 131 वी जयंती सावनेर तहसील कार्यालयात सामजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली.*

*याप्रसंगी समाजातील सर्व घटकांना शासनातर्फे मदतीचा लाभ देण्यात येत असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.*

*सावनेर तहसील कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात 57 लाख रुपयांच्या अनुदानाचे धनादेश मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले,*

*याप्रसंगी माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हत्रे, तहसीलदार प्रताप वाघमारे, पंचायत समीती सावनेर चे विस्तार अधिकारी दिपक गरुड,शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जैस्वाल,समाजसेवी मनोज बसवार प्रामुख्याने उपस्थित होते,*

*आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर गरीबांसाठी जगले, त्यांचे हे विचार आपणास प्रेरणा देतात. त्यानुषंगानेच त्यांच्या जयंतीनिमित्त गरीब व गरजु महिलांना अनुदानाचे वाटप करण्यात आले. ही त्यांना खरी आदरांजली ठरेल, कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र हाहाकार माजला होता,त्याकाळात सर्व व्यक्ती जाती, धर्म, भेदभाव विसरुन एकमेकांना सहाय्य करीत होते.हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे.भारतीय स्वातंत्र्य लढयात कुणीही जातीधर्म बघुन लढले नाही.एकमेकांचा असलेला द्वेष विसरुन असेच एकमेकांना सहाय्य करण्याची भावना नेहमी मनात ठेवावी,द्वेष विरहीत राष्ट्राची भावना ही आज मूलभूत गरज आहे. तसेच देश संघटीत राहील. जयंती साजरी करतांना महापुरुषांच्या विचारांचे चिंतन करणे गरजेचे आहे. गोरगरीब जनतेच्या संकटकाळात शासन नेहमी पाठीशी आहे, असे ते म्हणाले. भारतीय घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समता व बंधुतेचा मंत्र आपणास दिला त्यांचे पालन करणे म्हणजेच त्यांची जयंती सार्थ ठरेल.असे ठाम मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले*

*सामाजिक न्याय दिनाच्या निमित्त कोराना महामारी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची विधवा पत्नी शिला प्रकाश गजभिये हिला 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी प्रतिभा दुधे हिला 1 लाख रुपयांच्या अनुदानासह राष्टीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत एकूण 24 महिला लाभार्थ्यांस अनुदानाचे वाटप केदार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिव्यांग लाभार्थी लकी योगेश कोचे यास शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.*

*कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्यातर्फे आदरांजली वाहण्यात आली.डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त “सामाजिक न्याय दिवस” म्हणून साजरा करण्यात आल्याबद्दल मंत्री सुनील केदार यांनी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या प्रयत्नाची प्रशंसा केली.सदर आयोजनास अँड्.श्रीकांत पांडे,पंचायत समीती सदस्य गोविंदा ठाकरे,माजी नगरसेवक गोपाल घटे,सरपंच अशोक डवरे,अश्विन कारोकार,लाभार्थी महिला, नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …