*डॉ पंजाबराव देशमुख रा शि परिषदे ची शिक्षण परिषद कन्हान ला थाटात साजरी*
*शिक्षण परिषदेत महात्मा फुले राज्यस्तरिय पुरस्कार २०२२ ने २१ शिक्षक सन्मानित*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदे च्या वतीने डोणेकर सभागृह कन्हान येथे शिक्षण परिषदेचे आयोजन करून महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २१ शिक्षकांना महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरिय शिक्षक पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र, नागपुर विभागा व्दारे (दि.१०) एप्रिल डॉ पंजाबराव देशमुख यांचा स्मृतीदिन आणि (दि.११) एप्रिल २०२२ ला महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती निमित्य डोणेकर सभागृह जे एन रोड कन्हान येथे शिक्षण परिषद सोहळयाच उदघाटन डॉ.पं.दे.रा.शि. परिषद राष्ट्रीय अध्यक्ष मा.पप्पु पाटील भोयर यांच्या अध्यक्षेत, राष्ट्रीय प्रवक्ते मा श्रीमंत कोकाटे यांचे प्रमुख उपस्थित आणि ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांचे हस्ते महापुरूषा च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी डॉ. पंदेराशि.परिषदचे महासचिव सतीश काळे, उपाध्यक्ष राजेंद्र भोयर, विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, मराठा सेवा संघ नागपुर शहराध्यक्ष प्रमोद वैद्य, सचिव पंकज निंबाळकर, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संजय कानतोडे, ईश्वर डाहाके, विदर्भ मा शि संघ जिल्हाध्य क्ष अनिल गोतमारे, बहुजन शि सं जिल्हाध्यक्ष सामिर पिल्लेवान, मराशिसं सहसचिव महेश गिरी, मराजुनी पे ह संघटना राज्याध्यक्ष शिव धोती, विदर्भ प्रा शि सं अध्यक्ष मिलिंद वानखेडे, सचिव खिमेश बढिये,अभा शि सं जिल्हाध्यक्ष धनराज बोंडे, कास्टाईब शिसं उपाध्यक्ष परसराम गोडाणे, फिनीक्स पब्लिक स्कुल संचालक विठ्ठल ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थिती होते. यावेळी शिक्षणात पाठय पुस्तकांची भुमिका महत्वाची विषयावर राष्ट्रीय प्रवक्ते मा श्रीमंत कोकाटे हयांनी मौलिक मार्गदर्शन केले. त्यानंतर महाराष्ट्रातील क्रिडा, विज्ञान, संशोधन, संस्कृती, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, नवो पराक्रम सामाजिक जनजागृती, डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदे च्या भारत निर्माण कार्यक्रम अंतर्गत दत्तक ग्राम उपक्रमात भरीव योगदान देऊन आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील उल्लेखनिय कार्य करणार्या छऍीसया राज्यातील २१ शिक्षक, शिक्षिका व प्राध्यापक यात १) सुर्यलता उत्तम अडकमोल जळगाव, २) प्रा धाराशिव वैजनाथ शिरले जि नांदेड, ३) विजयराव चौधरी जि वर्धा, ४) मनीषा संजीव शिंदे खापरखेडा जि नागपूर, ५) प्रा कविता दिनेश चिखले कळमेश्वर जि नागपुर, ६) गोपीनाथ गुंड पवार जि पर भणी, ७) याकुब अब्बास शेख जि वर्धा, ८) विठ्ठल तुकाराम चव्हाण जि नांदेड, ९) विद्या पाटील सिंदखेड जि धुळे, १०) पिंकी रवींद्र चिखले सावंगी जि नागपूर, ११) डॉ मीनाक्षी विजय वासनिक महाल जि नागपूर,१२) गोविंदा रामा गुप्ते जि परभणी,१३) संजय आनंदराव ठाकरे जि हिंगोली, १४) नितीन अर्जुनराव कपटी जि औरंगाबाद, १५) वंदना पाटील जि धुळे, १६) प्रा गजानन मुरलीधर मुळे जि हिंगोली, १७) सपना मानकर जि नागपुर,१८) राजेन्द्र भाजीखाये जि वर्धा, १९) दिगांबर जगताप जि नादेंड, २०) प्रविण चांदसरे धुळे, २१) प्रसन्नजित गायकवाड जि नागपूर आदीना डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार २०२२ मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करित सत्कार करण्यात आला. शिक्षण परिषद सोहळयास शिक्षक, शिक्षि का सह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमा चे सुत्रसचांलन जिल्हा सचिव संजिव शिदें यानी तर आभार मेघराज गवखरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता संजय निंबाळकर, नंदलाल यादव, मोतीराम रहाटे, संजिव शिंदे, विनोद चिकटे, मेघराज गवखरे समिर शेख, अमोल डेंगे, हर्षा वाघमारे, मनिषा शिंदे, मायाताई इंगोले, लताताई जळते, छाया नाईक, अल्का कोल्हे, सुनिता ईखार आदीने सहकार्य केले.