पेंढरी-गट्टा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी आविसं तर्फे प्रज्वल नागुलवार यांचे नामांकन दाखल
विशेष प्रतिनिधि
सिरोंचा–धानोरा तालुक्यातील पेंढरी-गट्टा या जिप क्षेत्रासाठी पोट निवडणूक घेण्यात येत आहे.
या पोट निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच पक्षाकडून उमेदवारी उभे करत असून गडचिरोली जिल्हा परिषदेत 7 जिल्हा परिषद सदस्य असलेल्या आणि जानेवारी महिन्यात होणाऱ्या अध्यक्ष आणि उपअध्यक्ष निवडणुकीत किंग मेकर ठरणाऱ्या आदिवासी विध्यार्थी संघटना विदर्भ नागपूर जिल्हा गडचिरोली शाखेच्या वतीने 18 -पेंढरी-गट्टा जिल्हा परिषद पोट निवडणुकी करिता आविस संघटनेकडून आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रज्वल नागुलवार रा,एटापल्ली यांनी नामांकन दाखल केले.
यावेळी शिवराम पुल्लूरी,मिथुन देवगळे, रवी वेलादी,मुकेश नरोटे, राजू परसे सह आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पेंढरी-गट्टा या जिल्हा परिषद क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागेसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या जागेचा पोट निवडणुकीसाठी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे विदर्भ नेते, माजी आमदार दिपकदादा आत्राम आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे विद्यमान उप अध्यक्ष अजयभाऊ कांकडलावार यांचा मार्गदर्शनाखाली आविसचे सचिव प्रज्वल नागुलवार यांनी नामांकन दाखल केले आहे. या पोट निवडणुकीत आपण निवडून आल्यास पेंढरी-गट्टा जिल्हा परिषद क्षेत्राच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहून क्षेत्राचा विकासासाठी आपण प्रयत्न करू तसेच या क्षेत्रातील मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रज्वल नागुलवार यांनी म्हटले आहे