*कन्हान परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती थाटात साजरी* *विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती थाटात साजरी*

*विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरात व परिसरात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची १३१ वी जयंती निमित्य विविध सामाजिक , शासकीय , राजकिय , समाजसेवी संस्था आणि नागरिकांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी भीम जयंती महोत्सव थाटात साजरा केला .

*कन्हान – पिपरी नगर परिषद*

कन्हान – पिपरी नगर परिषद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नगरसेवक विनय यादव यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व नप अधिकार्यांनी , कर्मचार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी नप कार्यालय अधीक्षक सुशांत नरहरे , नामदेव माने , पंकज खवसे , निरंजन बडेल , भिमराव मेश्राम, पवन समुद्रे, पृथ्वीराज चवरे प्रामुख्याने उपस्थिति होते .

*आदर्श हायस्कुल, आयडियल काॅंन्हेंट व हिंदी प्राथमिक शाळा कन्हान*

आदर्श हायस्कुल कन्हान, आयडियल काॅन्व्हेंट व हिंदी प्राथमिक शाळा कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करून कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत सावळे यांच्या हस्ते व हायस्कुल विभागाच्या मुख्याध्यापिका सी एन मेश्राम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता सी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेड कर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमा ची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित प्राथमिक विभागाचे शिक्षक प्रशांत वैद्य, भरत सावळे, यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सी एन मेश्राम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. या प्रसंगी आदर्श हायस्कुल, आयडियल काॅंन्व्हेंट व हिंदी प्राथमिक विभागाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मनोज डोंगरे सर यांनी केले.

*ग्राम पंचायत कार्यालय येसंबा*

ग्राम पंचायत कार्यालय येसंबा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले असुन प्रामुख्याने उपस्थित सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करित व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी संविधाना चे वाचन करण्यात आले असुन कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित सर्व ग्राम पंचा यत सदस्यांनी, अधिकाऱ्यांनी व नागरिकांनी डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून जयंती थाटात साजरी कर ण्यात आली. याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य अश्विन डडुरे, पंकेश्वर चकोले, सदस्या वनिता राऊत, हिरा चकोले, माया चकोले, अरूणा बांगडे, सुषमा गजभिये , कांता गजभिये, बबनजी घरजाळे, भोजराज घरजाळे , विठ्ठलराव महाल्ले सह गावातील नागरिक बहु संख्ये ने उपस्थित होते.

*राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हान*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्य राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हान द्वारे तारसा रोड चौक पासुन पंचशिल नगर सत्रापुर, आंबेडकर चौक, नाका नं.७ ते तारसा रोड चौका पर्यंत विदर्भ ऑटो रिक्क्षा फेडरेशन उपाध्यक्ष नरेन्द्रजी वाघमारे यांच्या नेतुत्वात ऑटो रॅली काढुन तारसा रोड चौक ऑटो स्टँड येथे समापन करण्यात आली. सायंकाळी राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हा न व्दारे भोजनदान करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हान कार्याध्यक्ष बाळुभाऊ नागदेवे, अध्यक्ष नरेन पात्रे, विनोद रंगारी, चंदु पात्रे, शेखर पेटारे, सुवर्णा गायकवाड, चंद्रमनी भेलावे, सोनु खडसे, मनोहर बनकर, अर्जुन पात्रे, सनी पात्रे, अनिस पात्रे, मनोज चाबुकवार, ज्युनियर डॉन, नमन नागदेवे, संजु शेंडे, आकाश नाडे, प्रमोद चनकापुरे, प्रकाश भोवते, श्रावन लोंढे, संजय गुरधे, रामरतन पात्रे आदीने उपस्थित राहुन मौलाचे सहकार्य केले .

*वंचित बहुजन आघाडी कन्हान*

गहुहिवरा रोड चौक कन्हान येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर वंचित बहुजन आघाडी कन्हान व्दारे मोठया उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती निमित्य लहान मुलांच्या हस्ते केक कापुन बाबासाहेबांना अभिवादन करून डी जे च्या धूम मध्ये मुलांनी नाचुन बाबासाहेबाची जयंती उतसाहत साजरी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महिला, पुरुष, छोटे मुलं -मुली उपस्थित होते. याप्रसंगी प्रामुख्याने कन्हान शहर अध्यक्ष नितेश हरिचंद्र मेश्राम, विधानसभा पदाधिकारी राजेंद्र फुलझेले, कन्हान शहर प्रवक्ता रजनीश वामन मेश्राम, अमित भाऊ पाटील, मनीष शंभरकर, सतीश उके, मनीष नंदेश्वर, सोनु खोब्रागडे, पंकज रामटेके, मंगेश रंगारी, चिमणकर ताई, लीलाबाई रंगारी, छाया साखरे, सतीश ढबाले, शैलेश भाऊ ढोके, रोहित कनोजिया, आफताब भाई शेख सह अनेक कार्यकर्ते आणि बाल मित्र उपस्थित होते.

*सत्तधम्म बोद्ध विहार सिद्धार्थनगर स्टेशन रोड कन्हान*

सत्तधम्म बोद्ध विहार, सिद्धार्थ नगर रेल्वे स्टेशन रोड कन्हान द्वारा महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली.
बुधवार (दि.१३) एप्रिल ला सत्तधम्म बोद्ध विहार, सिद्धार्थ नगर रेल्वे स्टेशन रोड कन्हान येथे ई श्रमकार्ड , आधार कार्ड, हेल्थ कार्ड बनविण्याचे निशुल्क शिबीर घेऊन परिसरातील नागरिकांना लाभ देण्यात आला. मध्यरात्री १२ वाजता बाबासाहेबांचा जय घोष करून मानवदंना अर्पण करून केक कापुन बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला. गुरूवार (दि.१४) एप्रिल ला सकाळी ९ वाजता परित्रम पाठ व बुद्ध गीत गाण्यात आले. सत्तधम बोद्ध विहार, सिद्धार्थ नगर रेल्वे स्टेशन रोड कन्हान येथुन सायंकाळी ६ वाजता महारेली काढुन आखाडा, दानपटा सह डॉ आंबेडकर चौकात पोहचुन डॉ. बाबासाहेब यांचा पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. आखाडा च्या माध्य मातुन युवक युतीने शिवकालीन शस्त्र कलेचे प्रदर्शन करून सगळ्याचे लक्ष वेधले. रेली परत विहार पोहचुन रात्री ८ वाजता पासून महाप्रसाद वितरण करण्यात आला. कार्यक्रमाय्या यशस्वितेकरिता भिवगडे परिवार , राऊत परिवार, चहांदे परिवार, मेश्राम परिवार, वासे परिवार, वंजारी परिवार, केतन भिवगडे, रितेश जनबंधु , शुभम चहांदे, रोशन सोनटक्के, निलेश गाढवे, श्याम मस्के, सचिन ढोबले, जगदीश कुभारे संपूर्ण सिद्धार्थ नगरवासी सह राजे ग्रुप कन्हान चे विशेष सहकार्य लाभले.

*वराडा येथे डॉ बाबासाहेबाची जयंती साजरी*

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक वराडा येथे सरपंचा विद्या दिलीप चिखले यांचे अध्यक्षेत व प्रमुख अतिथी गोंडेगाव जि प सदस्य व्यकटराव कारेमोरे, डॉ ए एम गोंडाणे, माजी सभापती देविदास जामदार आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळयास माल्याल्पण व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी डॉ बाबासाहेबांच्या जिवनावर उपस्थिताना मार्गद र्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नारायण पाटील, गुलाब मेश्राम, शामराव गजभिये, पिंताबंर मेश्राम , लिलाधर पाटील , सुभाष पाटील , खुशाल पाटील , रामा उके , भिमराव रामटेके , अरविंद मेश्राम , सिध्दार्थ मेश्राम , प्रविण पाटील , मिथुन सोमकुवर , शिवदास डोंगरे , संजय मेश्राम , हर्षल नेवारे , उमेश मेश्राम, सावन पाटील, राहुल खोब्रागडे, रोशन जामदार, बाळकृष्णा पारधी, दिेनेश चिंचुलकर, नरेंद्र गजभिये, संघपाल गजभिये, प्रणय पाटील, राकेश धोटे, विवेक नाकतोडे, अक्षय मेश्राम, उपासिका अनिता पाटील, ज्योती मेश्राम, सुलोचना पाटील, विद्या रामटेके, सुनिता पाटील, कौशल्या पाटील, कविता मेश्राम, देवका गजभिये, निर्मला उके, प्रेरणा पाटील, वेदिका मेश्राम, काजल उके, शितल रामटेके आदीने सहकार्य केले.

*बाळासाहेब विचार मंच, कन्हान*

बाळासाहेब विचार मंच द्वारे भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य संघटन कार्यालय तेजाब कंपनी ग्राउंड येथे साजरी करण्यात आली. प्रामुख्याने उपस्थित संघटनेचे अध्यक्ष महेन्द्र भुरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थिताना बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून अंगिकारण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ११ गरिब शालेय विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश व साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब विचार मंच पुरुषोत्तम येनेकर, सचिन नांदुरकर, अमर किरपाने, गणेश पाली, रूपेश सातपुते, अनिल चौरसिया, नाना मेश्राम, भरत गोखे, प्रविण माधवे, प्रमोद समुद्रे, अनिल बारई, ऋृषी तुरंतकर, गणेश नागतोडे, नेवालाल साहारे , कुबेर पोटभरे, शुभम घावडे, मनोज बावने, नामदेव कांबळे, जोशिला उके, संजय ठाकुर, संदिप कभे, गुण वंता आंबागडे, भोजराज कुर्वे सह नागरिक उपस्थित होते.

*सर्वधर्म समभाव द्वारे पुस्तक आणि नोटबुक वितरित*

सर्वधर्म समभाव च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले होते. महिला काँग्रेस कमिटी कन्हान शहर च्या अध्यक्षा रिता बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना बुक , पेन व फराळाचे वाटप माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला चंद्रशेखर भीमटे, मोरेश्वर बर्वे, दीपक बोदुले, सदर आलम खान, योगेश रंगारी, रेखा टोहणे, गुंफा तिडके , राजेश यादव , मनीषा भिवगडे, अमोल प्रसाद , विलास खोब्रागडे, बंटू, शेख अकरम कुरेशी, रोहित बर्वे, आकाश महातो, ज्ञानेश्वर दरोडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक चंदन मेश्राम, प्रशांत मासार यांनी प्रयत्न केले.

 

*भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कन्हान शहर*

भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कन्हान शहर द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक व नाका नंबर 7 येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नागपुर ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारें , शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी भाजपा अनुसूचित जाति मोर्चा नागपुर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष रिंकेश चवरे , भाजपा अनुसूचित जाति मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष लीलाधर बर्वे , महामंत्री सचिन वासनिक , मयुर माटे , भाजपा अनुसूचित जाति मोर्चा कन्हान शहर संजय रंगारी , शहर महामंत्री सुनील लाडेकर , माजी भाजपा कन्हान शहर अध्यक्ष विनोद किरपान , अमिश रुंघे , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , अजय लोंढे , मनोज कुरडकर , चंद्रगुप्त पानतावने , दिपंकर गजभिये , शालिनी बर्वे , मालन ढोके, चंपाबाई गजभिये , प्रतिमा रंगारी , बेबीबाई वासनिक सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …