*कन्हान परिसरात हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमाने थाटात साजरा*
*कांद्री , टेकाडी , सहित अनेक हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
कन्हान – कन्हान , कांद्री , टेकाडी सहित अनेक विविध ठिकठिकाणी हनुमान मंदिरात जन्मोत्सव निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन व नागरिकांना महाप्रसाद वितरण करुन हनुमान जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला .
*शिव पंचायत मंदिर कमेटी , गांधी चौक , कन्हान*
शिव पंचायत मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन शनिवार दिनांक १६ ला हनुमान जन्मोत्सव दिनी सकाळी मंदिरात विधिवत पूजा अर्चना करून हवनयज्ञ करुन घटस्थापना करणात आली असुन दुपारी भजन कीर्तन कार्यक्रम संपन्न करण्यात आले असुन सायंकाळी विधिवत पूजा अर्चना करून आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वितरण करुन हनुमान जन्मोत्सव विविध कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी शिव पंचायत मंदिर कमेटी अध्यक्ष मोहनसिंग यादव , उपाध्यक्ष सुरेंद्र शर्मा , सचिव उमेश यादव , कोषाध्यक्ष नंदलाल यादव , मार्गदर्शक राजेश यादव , भरत सावळे , शुभम यादव , सह आदिं नी उपस्थित राहुन सहकार्य केले .
*श्री हनुमान मंदीर रायनगर कन्हान महाप्रसाद वितरण करून जयंती थाटात साजरी*
श्री हनुमान मंदिर पंचकमेटी जे एन रोड रायनगर कन्हान द्वारे श्री हनुमान मंदीरात भाविकांनी पुजा, अर्चना, दहिकाला, महाआरती करून भव्य महाप्रसाद वितरणाने श्री हनुमान जयंती थाटात साजरी करण्यात आली.
मागील दोन वर्षापासुन कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने हनुमान जयंती मोजक्यात साजरी करण्यात आली होती .या वर्षी श्री हनुमान जयंती उत्सव श्री हनुमान मंदिर पंचकमेटी जे एन रोड रायनगर कन्हान द्वारे श्री हनुमान मंदीरात भाविकांनी उत्साहात पुजा, अर्चना, दहिकाला, महाआरती करून श्री हनुमाना च्या जय घोषात भव्य महाप्रसाद वितरणा चा परिसरातील भाविक भक्तानी श्री हनुमान जी चे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन श्री हनुमान जयंती उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संयोजक पवन माने, विनायक हिवसे, सुभास यादव, राजेश हुड, बंटी आकरे, शैलेश शेळके, आनंद चकोले, दाडी बाबा, नत्थुजी चरडे, अंबादास चकोले, सुरेश चौकसे, अनिल माटा, अरविंद मोहिंकर, चेतन वैद्य, जगदीश हूड, अजय सरोदे, गणेश हूड, पिंटू निंबाळकर, प्रविन माने, शिव वानखेडे, कमलेश येरपुडे, मनोज झाडे, अनमोल वाघमारे, शुभम वाघ मारे, प्रफुल सहारे, अमित वानखेडे, सुनील अम्बागडे, गजानन कुंभलकर सह नगरवासीयांनी सहकार्य केले.
*संताजी नगर मित्र परिवार व भुमिपुत्र युवा बहुद्देश्यीय प्रतिष्ठान*
संताजी नगर मित्र परिवार व भुमिपुत्र युवा बहुद्देश्यीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान जन्मोत्सव निमित्य दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
शनिवार दिनांक १६ एप्रिल ला हनुमान जन्मोत्सव दिनी श्री हनुमान मंदिरात अखंड रामायण पाठन करण्यात आले असुन रविवार दिनांक दिनांक 17 ला परिसरात भव्य महाप्रसाद वितरण करुन हनुमान जन्मोत्सव दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी रामभाऊ दिवटे महामंत्री ,ओबीसी आघाडी, नागपुर ज़िल्हा ग्रामीण ,पंढरी बालबुधे , देवेंद्र सेंगर , लेकुरवाडे, शिवाजी चकोले , आमिष रूंघे , मनोज गिरी , नारद दारोड़े , विनोद किरपान, डॉ गिरडकर, नेवालाल सहारे सह आदिं नी भेट देऊन हनुमान मंदिरात दर्शन घेतले .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता
अतुल हजारे , पंकज गुरव , प्रफुल हजारे , अजय राठौड़ , लल्ला डेहरिया , मनोज वडे , सतीश झलके , अमर कुंभलकर , अजय सैनी , संतोष सिंह , संजय लांडगे , चंदू ठाकरे भगवान मसके , मोनीष शेन्द्रे , बंटी यादव , कैलास काकड़े , सोनू नाइक , शुभम यादव , निखिल हजारे , नन्दू बराई , उमेश लोनारे , बंटी पाल , चिंतामन सारवे , कुणाल वानखेड़े , अरुणा हजारे , वंदना गड़े , रुपाली हजारे , मीरा कुंभलक़र , राखी गभने , सुनीता चटप , जीजाबाई लोनारे , बबली सिंह , मीरा पाल सह आदि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .
*श्री हनुमान मंदिर , देवस्थान , खदान रोड , कांद्री*
श्री हनुमान मंदिर , देवस्थान , खदान रोड , कांद्री येथे हनुमान जन्मोत्सव दिनी सकाळी ४:०० वाजता पंडित अरविंद पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झिबल सरोदे , वासुदेव आकरे , रामा हिवरकर , बंटी आकरे , कुरेश वाडीभस्मे , अनिल पोटभरे , सुरेश उमक सह आदि भक्तगण यांच्या हस्ते दुध घी चा अभिषेक करुन , पूजापाठ , होम , आरती करण्यात आली असुन ७:०० वाजता दहीकाला कार्यक्रम महादेव किरपान यांच्या हस्ते व महेंद्र बाबु यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न करण्यात आला . त्यानंतर भजन मंडळ प्रमुख कवडु बारई , शंकर सरोदे , मधुकर कामडे , सुनिता हिवरकर , आणि लतादिदि यांनी सुद्धा जस भजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला असुन सायंकाळी परिसरातील नागरिकांना महाप्रसाद वितरण करुन हनुमान जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे आयोजक वामन देशमुख , प्रविण आकरे , शिवाजी चकोले , विजय आकरे , सिताराम बावनकुळे , विष्णु सरोदे , प्रदीप आकरे , सुरेंद्र पोटभरे , प्रविण हिंगे , प्रशांत देशमुख , राजहंस वंजारी , संकेत चकोरे , मनोज कश्यप , सुनिल प्रजापती व ओमदास लाडे , सह आदि ने सहकार्य केले .
*टेकाडी चा पारंपरिक रामनविमी ते हनुमान जयंती सप्ताह संपन्न*
टेकाडी गाव हे प्रभु श्री रामचंद्र प्रशित भुमी असुन वर्षानुवर्षा पासून रामनवमी ते हनुमान जयंती सप्ताह चा कार्यक्रम आयोजित केला जातो. कोरोना काळातील दोन वर्ष सोडले तर यावर्षी श्री रामनवमी ते श्री हनुमान जयंती २४/७ हरिनाम सप्ताह साजरा करून भव्य महाप्रसादाचा पंचकोशीतील भाविक मंडळीने महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री हनुमान मंदीर देवस्थान कमेटी टेकाडी व्दारे श्री रामनवमी ला दुपारी १२ वाजता श्री हनुमान मुर्ती चा अभिषेक व घटस्थापना करून सतत सात दिवस भजन मंडळाचा उभा पाहरा सुरू करित विविध भजन मंडळाने २४ तास ७ दिवस उभे राहून श्रीराम व श्री हनुमान चे नाम स्मरण करित भजन करण्यात आले. या भजना मध्ये लहान मुला पासून ते वयोवृद्ध मंडळी ने सहभाग घेतला होता. रविवार (दि.१७) ला ७ व्या दिवशी वारकरी भजन मंडळीने गोपाल काल्याचे भजन व फुगडी खेळुन गोपाल काला करण्यात आला. काल्याचा प्रसाद वितरणा नंतर घट मंदिरातून पुजारीने डोक्यावर घेऊन गावा सभोवताल प्रदक्षिणा घालुन घटा चे राम सरोवरात विसर्जन करण्यात आले. यात श्री देवमनजी हुड भजन मंडळ टेकाडी, गोपिचद्रं गुरधे भजन मंडळ, जय दुर्गा भजन मंडळ, अतुल खेडकर शिवशक्ति भजन मंडळ, आरती भजन मंडळ, जय रघुनंदन भजन मंडळ, संत गजानन भजन मंडळ सह इतर भजन मंडळीने भजन गात गाव प्रदक्षिणा घातली. सायंकाळी महाप्रसादाला सुरूवात करून पंच कोशी परिसरातील भाविक भक्तांनी पंगती मध्ये बसुन महाप्रसादाचा लाभ घेतNला. याप्रसंगी नागपुर जि.प अध्यक्षा सौ, रश्मी बर्वे, पं स सभापती मिना कावळे, पं स सदस्या करूणा भोवते, टेकाडी सरपंचा सुनिता मेश्राम, आमदार आशिष जैस्वाल, माजी मंत्री राजेन्द्र मुळक, माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, माजी आमदार डी एम रेडडी, नरेश बर्वे, शिवकुमार यादव, उमाशंकर सिंह, रामभाऊ दिवटे, बन्टी आकरे, साबीर सिध्दीकी, उमेश कुंभलकर, सुरेश गुरव सह टेकाडी ग्रा प सदस्या सह मान्यवरांनी मंदीरात भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री हनुमान देवस्थान टेकाडी चे अध्यक्ष पंढरी बाळबुधे सह पदाधि कारी, सदस्य व समस्त टेकाडी ग्रामवासीयानी सहकार्य केले.