*महाआरोग्य मेळाव्यात प्लँनेट आयटी चा उत्सफुर्त सहभाग*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः दि.19 ऐप्रील रोजी आयुष्यमान भारत,सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केन्द्र सावनेर येथे आयोजित भव्य आरोग्य मेळाव्यात शहरातील प्रतिष्ठित प्लँनेट आयटी च्या सर्व चमुंनी सहभाग नोंदवत जवळपास 100 च्या वर लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड वेळीच तयार करुण देत मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित नागपुर जिल्हापरेषदेच्या उपाध्यक्षा सुमित्राताई मनोहर कुंभारे,उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,बालरोगतज्ज्ञ डॉ.विजय धोटे,माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे,राजराजश्री आश्रमचे आध्यात्मिक धर्मगुरू राजकुमार बसवार,गुरूमाता दिप्तीजी,प्लँनेट आयटीचे संचालक अभिषेकसिंग गहरवार आदिंच्या हस्ते वाटप करण्यात आले*
*सदर महाआरोग्य मेळाव्यात प्लॅनेट आय टी तर्फे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड बनविण्याचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १०० लाभार्थी नी कार्ड बनवून घेतले. एस डी ओ साहेबांच्या हस्ते हे कार्ड लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्लॅनेट आय टी चे संचालक अभिषेक सिंह, भारती लोलुसरे, श्रेया सोमकुवर, गीता गुप्ता, संजिता नानवटकर इत्यादींनी प्रयत्न केले*