*मद्दीकुंठा आणि रामांजपुर येथील रोहयो अंतरंगात झालेल्या सीसी रोड कामाची चौकशी करण्यात यावी*
*महिला व बाल कल्याण सभापती- जयसुधा जनगाम*
*तालुका प्रतिनिधी सिरोंचा -तिरुपती चिटयाला
*सिरोंचा* पंचायत समिती सिरोंचा अंतरंगात येणाऱ्या ग्राम पंचायत मद्दीकुंठा आणि रामांजपुर टोला येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतरंगात पन्नास लाख रुपये किमतीचे सीसी रोड काम करण्यात आले आहे. मात्र पंचायत समिती सिरोंचाचे उप सभापती यांनी रोजगार हमी योजनेचे नियम मोडून तत्कालीन संवर्ग विकास अधिकारी यांचेवर दबाव आणून हे कामे करून घेतले आहे.
रोजगार हमी योजनेत 60/40 रेश्यु प्रमाणे 60%मातीचे काम केल्यावर उर्वरित 40%रकमेतून सीसी कांक्रीट रोड कामे करता येते मात्र ग्राम पंचायत मद्दीकुंटा हद्दीतील माद्दीकुंटा व रामांपुर टोला येथे उप सभापती यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून तत्कालीन संवर्ग विकास अधिकारी यांचेवर दबाव आणून सन 2017-2018 मध्ये या दोन्ही गावामध्ये मातीचा काम न करता 100% रक्कम म्हणजे 50 लाख किमतीचे सीसी रोड कामाचे काम पूर्ण केले असताना सुद्धा याकामाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत होता.
रोजगार हमी योजनेचा कामा मध्ये गैरव्यवहार होत असल्याची माहिती जिल्हा परिषद गडचिरोलीचे महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम याना कळताच यांनी(रोहयो) आयुक्त नागपूर,जिल्हा अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशीसाठी पत्रव्यवहार करून चौकशीचे आदेश दिले आहे.
चौकशीचे आदेश दिल्यावर पंचायत समिती सिरोंचाचे तत्कालीन संवर्ग विकास अधिकारी खिराळे हे करत होते. संवर्ग विकास अधिकारी यांचे हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्या नंतर या कामाचे चौकशी थंडबस्त्यात पडली आहे.तेव्हा पासून आज प्रयन्त या कामाचे चौकशीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आणि 1 वर्ष लोटूनाही कामाची चौकशी नाही आणि कोणत्याही प्रकारचे कारवाई करण्यात आलेली नाही.
ग्राम पंचायत मद्दीकुंटा व रामांजपुर टोला येथील सिमेंट कांक्रीट रोड कामाचे तत्काळ चौकशी करून संबंधित अधिकार्यवार कडक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी असे मागणी जिल्हा परिषद गडचिरोलीचे महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी केली आहे.