*ट्रक चालकाने एमएसईबी चे ट्रान्सफार्मर ला धडक मारून दोन लाखाचे केले नुकसान* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन आरोपी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

*ट्रक चालकाने एमएसईबी चे ट्रान्सफार्मर ला धडक मारून दोन लाखाचे केले नुकसान*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन आरोपी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गहुहिवरा रोड चौक येथे एका ट्रक वाहन चालकाने एमएसईबी चे ट्रान्सफार्मर ला धडक मारून अंदाजे एकुण २ लाख रूपया चे नुकसान केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार (दि.१९) एप्रिल ला सायंकाळी ६ वाजता दरम्यान ट्रक क्रमांक एम एच ३१ सी ओ ४७८१ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन मागे घेतांना निष्काळजी पणाने चालवुन कन्हान शहर विद्युत अभियंता प्रल्हाद बुद्धालाल ओमकार यांचे अधिकार क्षेत्रात असलेले एमएसईबी चे ट्रान्सफार्मर ला धडक मारून अंदाजे एकुण २,००००० ( दोन लाख) रुपयाचे नुकसान केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी प्रल्हाद बुद्धालाल ओमकार यांच्या तक्रारी वरून आरोपी ट्रक चालका विरुद्ध कलम २७९, ४२७, १८४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …