*महात्मा ज्योतिबा फुले पूण्यतिथी साजरी*
*सावनेर प्रतिनिधी- सुरज सेलकर*
सावनेर—स्थानिक के.डी.पवार शिक्षण महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पूण्यतिथी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यानी सामुहीकरित्या श्रद्धांजली अर्पन करूण महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनपटावर आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच या दिना निमित् ” नैसर्गिक आपत्तीस कारणीभूत कोण? ” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला परिक्षक म्हणून स्थानिक के.डी.पवार बि.पी.एड. महाविद्यालयाचे अंतुरकर सर उपस्थित होते. कार्यकमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ .एस ए.घोडेस्वार,प्रमुख अतिथी म्हणून डाॅ .भाविका जैन मॅडम,उपस्थित होत्या. तसेच जे . हीरास मॅडम, माडेकर मॅडम, चौधरीमॅडम, बावणकर सर , देशमुख सर, फलके सर , लोणारे सर आदींची उपस्थिती होती.कार्यकमाचे संचालन रोहीणी बुरहान हीने केले तर आभार स्वाती चव्हान हिने मानले.राष्टृगिताने कार्यकमाची सांगता झाली.