*पिपरी शाळेत शाळापुर्व तयारी मेळावा संपन्न*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत जि प उच्च प्राथमिक शाळा पिपरी येथे शाळापूर्व तयारीचे नियोजन या विषयावर मेळावा व प्रभात फेरी काढुन शिक्षणा विषयी जनजागृती करून मेळावा थाटात साजरा करण्यात आला.
शाळापुर्व तयारी पालक मेळाव्याचे नगरसेविका रेखाताई टोहने हयांचे हस्ते व सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार, विनोद येलमुले, कुंदन रामगुंडे, ओमवती सनोडिया यांच्य प्रमुख उपस्थित उद्घाटन करण्यात आले. सध्या जि प शाळे पासुन विद्यार्थी दुर जात आहेत.
पालकांचाही कल दिसुन येत नसुन संभाव्य धोका ओळखुन जि प शाळा पिपरी व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ च्या सत्रात इयत्ता पहिली च्या प्रवेशा करिता पिपरी गावात प्रभात फेरी काढुन व मेळाव्याचे आयोजन करून माता , पालकांना शासनाच्या विविध योजनाची माहीती देऊन शिक्षणा विषयी जन जागृती करून जि प पिपरी शाळेत इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या ६ वर्ष वयोगटाच्या बालकांच्या सुप्त गुणांची पडताळणी करण्यात आली. आणि माता, पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्याच्या यशस्वितेकरिता जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका खरवडे मॅडम, हुमने मॅडम, मायाताई इंगोले मॅडम, जुनघरे मॅडम, शिक्षक बावनकुळे सर तसेच अंगणवाडी सेविका सुनिता मानकर, विजय मानकर, सुंनदा ढोले, उर्मिला तिरपुडे, शारदा मेश्राम, कुंदा रंगारी, मीना बागडे, संजना सोनेकर आदीने सहकार्य केले. मेळाव्यास अंगणवाडी सेविका व मदतनीस, माता व पालक बहु संख्येने उपस्थित होते.