*कन्हान शहराच्या भविष्याचा विचार हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनी कितपत घेणार ?*
*पारशिवनी तालुक्यातील हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनीचा इतिहास फक्त तोंडावर*
*रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांच्या नशीबी परत निराशा*
कन्हान प्रतिनिधि -ऋषभ बावनकर
कन्हान – रामटेक विधान सभेतील प्रवेशद्वार असलेले कन्हान शहर सोन्याचा धूर ओकत असल्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक स्तरावर ग्रामपंचायत पहिल्या क्रमांकाची असुन देखील लोहा घेत होती . याचा इतिहासाचा उजाडा म्हणून नदीचा काढेवर बसल्याने कन्हान शहर नावलौकिक प्राप्त झाले मात्र सोन्या धुर म्हणून बर्याच कंपन्या येथे वास्तव्यास होत्या त्यातच हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनी मध्ये कच्चा माल चायपत्तीचे उत्पादनाचे पॅकिंग होत असल्याने येथे रोजगार मोठ्याप्रमाणात स्थानिक आणि तालुक्यातील कितीतरी लोकांना मिळाला होता . त्यामुळे चार ते पाच हजार लोकांचा पोटा पाण्याचा विषय कंपनीचा आशीर्वादाने निकाली निघाला होता .
पण हळुहळु राजकारणाचे काडे ग्रहण लागल्याने कंपनी पोखरून काढून शेवटी बंद करण्याची वेळ निर्माण झाली . या पाठोपाठ शहरातील काही भागात सुरू असलेल्या छोट्या मोठ्या कंपनीचे दिवाळे निघाल्याने त्यांनी सुध्दा काढता पाय घेतला . त्यामुळे कन्हान शहरातील अर्थव्यवस्था पुर्ण पणे कोलमडून बेरोजगाराची मोठी फौज तयार झाली असुन ग्रामपंचायतीला दरवर्षी मिळणार्या करात कपात झाली . शहरात उद्यास आलेल्या छोटे मोठे उद्योग आणि व्यवसाय करणाऱ्याचे विकास चक्राची चाके थांबले . बर्याच लोकांनी कंपनीतून व सेवेतून बडतर्फ झालेल्या कर्मचारीवर्ग शहरातुन नागपुर जिल्ह्यात आणि इतर शहरात पलायण केले काही लोकांनी मुळ गावात तड ठोकला . त्यामुळे गाव ओसार झाल्याचे चित्र दिसुन येत होते .
पण मात्र काही होतकरू व बेरोजगार युवकांनी मणात आशा बाळगून होते की, कंपनी भविष्यात पुन्हा सुरू होऊन गेलेले दिवस परत येणार मात्र मागील आठवडय़ात हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनीने सतरा ते अठरा एकर कंपनीचा मालकीची जमीन विक्री काढल्याची जाहिरात प्रसिदध केल्याने होतकरू युवकांचा मनात निराशा जाळे निर्माण झाले .
कंपनीने जाहीरात प्रसीदध केल्याने कोण भाग्यवंत सतरा ते अठरा एकर जमीन घेऊन कन्हान शहराला न्याय देतो या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे . कन्हान शहरात लोकांन मध्ये चर्चेचे तसेच वातावरण निर्मिती झाली आहे. कन्हान ग्रामपंचायत दर्जा नगरपरिषद मिळाला पण जागेची कमतरता असल्याने शिवाय योग्य डी.पी. प्लान नसल्याने विकास कामापासून लांब आहे . जर कन्हान – पिपरी नगर परिषद ने ही सतरा अठरा एकर जमीन घेतली तर कन्हान शहरात खेळाचे मैदान , आठवडी बाजार , उपजिल्हा रुग्णालय , सुविधापूर्ण बस स्टॉप आणि तसेच शाॅपींग माॅल व नगर परिषद अंतर्गत दुकानाचे गाडे तयार करून मासिक किंवा वार्षिक भाड्याने दिल्याने नगरपरिषद तिजोरीत भर पडेल आणि विकास कामाला गती मिळेल शिवाय कन्हान शहराचे प्रवेशद्वारावर असलेल्या सौंदर्यीकरण सुध्दा भर पडेल . सध्या सत्तेवर कन्हान – पिपरी नगरपरिषद मध्ये शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षा , आमदार , खासदार शिवाय शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री पद सुध्दा महाराष्ट्रला मिळाले आहे . त्यामुळे निधी उपलब्ध करून कन्हान शहरात विकासकामांवर भर पडाला हवी अशी जनतेचे सुध्दा मत आहे.
जर हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनी ने कन्हान चा इतिहासचा संशोधन करून योग्य एखाद्या रोजगार निर्माण करुन देणाऱ्या कंपनीला विक्री केल्यास ब्रुक बॉन्ड कंपनीचे अस्तित्व कायम राहुन शहरात परत सोन्याचे धुर परत यायला जास्त वेळ लागणार नाही .
या सोबतच कंपनीची जाहीरात प्रसिदध झाल्याने काही इच्छुक छोटे मोठे उद्योगपती , दलाल , ले – आऊट वाले पाच ते दहा लोकांचा समुह एकत्र येऊन सतरा ते अठरा एकर जमीन घेण्याकरीता वेगवेगळ्या मार्गाने एडीचोटीचा जोर लावण्याचा शहरात उलट सुलट चर्चा आहे तर काही असामाजिक तत्त्वाचे लोक सुध्दा यात भागीदारी करण्याचा डाव आकत असल्याचे बोलल्या जात आहे. पण मात्र यात काही भागीदार आपला व्यक्तीगत स्वार्थ साधुन बगत असुन येते ले – आऊट आणि शाॅपींग माॅल टाकुन पैसे गुंडाळून दुसर्या ठिकाणी निघुन जाईल यात ले-आऊट वाले तर टाळुवरची मलाई खाणार पण शहरात लोकांची जमापुंजी व साठवलेला पैसाचा तडजोडीचा नावा खाली तिजोरी रिकामी होईल आणि परत बेरोजगारांची फौज दुप्पट तिप्पट होऊन मोठ्या प्रमाणात वाघेला .
या करीता हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनीने अस्तित्व कायम ठेवण्यासाठी ज्या जमिनीवर एवढे वर्ष शहरातील लोकांनी प्रेम केल आणि कंपनी विकासासाठी घाम गाळला त्यांनी स्वार्थ कडेला ठेऊन योग्य इच्छुक कंपनीला किंवा कन्हान नगर परिषद ला विक्रीपत्र करावे .
कन्हान शहरात आज सुध्दा रस्त्याचा दोन्ही कडेला नेहमीच बाजार व आढवळी बाजार भरतो. वर्दड व गर्दीत कित्येक लोकांनी आपला जिव गमावला तर काहीचा नशीबी अपंगत्व आले. या करीता बरेच आंदोलन आणि चक्का जाम करण्यात आले पण जागेची कमतरता असल्याचे भाष्यकरून लोक प्रतिनिधी आणि अधिकारी वेळ मारून घेतात.अशात मागील चार पाच वर्षा आधी रामटेक विधान सभेतील माजी खासदार प्रकाश जाधव यांनी काही युवकांना हाताशी घेऊन गावाचा हिता करीता आठवडी बाजार भरता याव म्हणुन हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनीचा मालकी जागेत प्रवेश करून बाजार भरण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचा वर व इतर लोकांवर गुन्हा दाखल झाला . त्यामुळे याकडे आता पर्यंत कोणी हस्तक्षेप केला नाही पण जाहीरात प्रसिदध झाल्याने परत एकदा प्रत्येकाचा मणात आशेची किरण निर्माण झाली आहे . त्यामुळे कंपनी योग्य किंवा अयोग्य लोकांचा हाती युवकांचा भविष्याचे सुत्रे हाती देणार काय ? याकडे चर्चा उदधान निर्माण झाले . तर मोठमोठ्या हवेत तीर मारणाऱ्या लोकप्रतिनिधी कितपत भुमिका पार पाडणार याचे प्रश्न निर्माण झाला आहे.
हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनी ची जागा घेण्याचा प्रयत्न करु – नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर
महाराष्ट्र शासनाला सत्तेवर असलेल्या पक्षाने 2018 मध्ये कन्हान शहराचा डी.पी.प्लान पाठवला या मध्ये स्वतःची मालकी असलेल्या हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनीची जमीन सोडण्यात आली होती . पण मात्र डी.पी.प्लानची मंजुरी अध्याप नगरपरिषद मिळाली नाही. त्यामुळे आम्ही नगरपरिषदेच्या वतीने पुढाकार घेऊन 18 एकर जमीन विकासकामासाठी आमदार आशीष जयस्वाल यांचा मार्गदर्शनात बैठक घेण्यात येऊन शासनाला निवेदन पाठवुन जमीन घेण्याचा पुर्ण पणे पर्यंत करून आढवळी बाजार, खेळाचे मैदान, बस स्टॉप आणि दुकानाचे गाडे इतर विकास कामे निर्माण करू .