*रक्तच्या नात्याला पडला आप्तांचा विसर* *शेवट अंतिम संस्कार करायलाही नाही आले…* *हितज्योती फाऊंडेशन ने सामाजिक बांधीलकी जपत निराधार आजीचा केला अंतिम संस्कार*

*रक्तच्या नात्याला पडला आप्तांचा विसर*

*शेवट अंतिम संस्कार करायलाही नाही आले…*

*हितज्योती फाऊंडेशन ने सामाजिक बांधीलकी जपत निराधार आजीचा केला अंतिम संस्कार*

*इतकेच मला जाताना सरणावर कळले होते”*
*मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते”…*

सावनेरः सजीवतेच्या नाश म्हणजे मृत्यू .मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य व जन्मास आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू होतो, आणी मृत्यू झालेल्या व्यक्तीला त्याच्या धर्म परंपरेने अंतिम संस्कार करण्यात यावा ही मनापासून इच्छा असते…*

*अशा बेवारस निराधार व्यक्तींवर अंतिम संस्कार करणे याला सुद्धा नशीब लागते, घरापासून दुरावलेले बेवारस निराधार मनोरुग्ण लोक आणि त्यांना नाकारणारा समाज पहायला मिळतो ,तर दुसरीकडे कोणतीही ओळख नसताना समाजसेवी हितेश बंन्सोड त्यांची अर्धांगिनी आणि हितज्योती फाऊंडेशनचे कार्यकर्ते त्या व्यक्तीवर त्यांच्या परंपरा व धर्मानुसार अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी पार पाडत आपल्या समाजसेचा परिचय देतात.आजवर हितज्योती ने मानवी आयुष्यातील देहावर सहा लोकांचे अंतिम संस्कार करण्यात आले जे लोक असेच निराधार होते.*

*”मानवी आयुष्यात देहावर केले जाणाऱ्या 16 संस्कारांपैकी सर्वात शेवटचे संस्कार म्हणजे अंतिम संस्कार.*

*अशीच एक घटना सावनेर शहरात घडली श्रीमती सोनाबाई दिनकर उमटकर या 76 वर्षीय वु्ध्दा 2016 पासुन स्वामी विवेकानंद वु्ध्दाश्रम सावनेर येथे वास्तव्यास होत्या वु्ध्दावस्थेमुळे त्यांचे आकस्मिक निधन झाले.वु्ध्दाश्रमाचे व्यवस्थापक अशोक बुधोलीया यांनी ठाणेदार मारुती मुळूक यांना सुचना दिली असता सावनेर पोलिसांनी मु्तक सोनाबाईच्या परिवाराशी संपर्क केला परंतु काहीच प्रतीऊत्तर मीळत नसल्याने.अंतिम संस्कार करण्याकरिता हितज्योती फाऊंडेशन ला विनंती करण्यात आली.हितज्योती फाऊंडेशन चे संस्थापक मुंबई ला असल्याने आता कसे होणार हा प्रश्न निर्माण होण्या आधीच हितज्योती फाऊंडेशन च्या ज्योतीताई बंन्सोड यांनी अंतिम संस्काराकरिता पुढाकार घेत मु्तदेहाला मुखाग्नी दीली…*

*या अंतिम संस्कारातून या आईच्या आत्मे व शरिराने राम गणेश गडकरी स्मशानभूमीतून जगाचा निरोप घेतला आणि याच समशान भूमीतून अनेक निरुत्तर प्रश्नांना जन्म देऊन गेल्या…*
*मृत्यूच्या भीती पेक्षा वेदनांचा त्रास मला अधिक जाणवू लागला कारण या समाजात लोक जिवंत असून सुद्धा मेल्यासारखे जगत आहे…*

*मरणे सोपे होते फक्त जगण्याने छळले होते,निरंतर जपलेल्या एकांताला हेच माझे उत्तर आहे…*


*या कार्यात मदत करुण मानुसकी जपणारे पोलीस निरीक्षक मारुती मुळक सामाजिक कार्यकर्ते हितेशदादा बनसोड,ज्योती हितेश बनसोड आदींच्या कर्तव्यदक्षतेला कोटी कोटी नमन…*

*”मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हाथ द्या”*

*हितज्योति आधार फाउंडेशन रोडवरील निराधार,अनाथ,अपंग बेवारस,मनोरुग्ण,अपघातग्रस्त लोकांसाठी काम करणारी संस्था तालुका सावनेर जिल्हा नागपूर महाराष्ट्र या संपूर्ण टीमचे जीतके कौतुक केले तीतके कमीच…*

*ज्योती बंन्सोड या समाजसेवी हितेश बंन्सोडच्या अर्धांगिनी असुन हितेश सोबत त्यांच्या समाजकार्यात सहकार्य करतात.काही कारणास्तव हितेश मुंबईला गेला असल्याने पतीच्या समाजसेवेचा वारसा स्वतः वहन करीत तीने मु्तक सोनाबाईच्या पार्थीवावर अंतिम संस्कार विधी करुण खरा समाजसेवी काय असतो हे समाजास दाखवून दीले हे विषेश…*
*ज्योतीने जे कार्य केले त्या कार्याची सर्व स्तरावर स्तुती होत आहे…*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …