*येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती थाटात साजरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११३ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
शनिवार दिनांक ३० एप्रिल २०२२ ला येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामगितेतुन लोकांना उपदेश देणारे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११३ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित येसंबा ग्रामपंचायत चे सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी, अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली . या प्रसंगी अंगणवाडी सेविका सौ.मायाताई चकोले , आशावर्कर सौ. सुषमाताई गजभिये , अंगणवाडी मदतनिस सौ.कांताताई गजभिये , श्री. रमेशजी हारोडे ,श्री.पवनजी हारोडे ,श्री.हंसराज घरजाळे ,ग्रामपंचायत कर्मचारी श्री. संजयजी गजभिये , बालगोपाल सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .