*ब्रेकिंग न्यूज* *टेकाडी फाट्याजवळ भीषण अपघात* *एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा व दुचाकी वाहन चालकाचा मृत्यु आणि एक महिला गंभीर जख्मी*

*ब्रेकिंग न्यूज*

*टेकाडी फाट्याजवळ भीषण अपघात*

*एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा व दुचाकी वाहन चालकाचा मृत्यु आणि एक महिला गंभीर जख्मी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी फाट्याजवळ एका कोळश्याचा ट्रक चालकाने दुचाकी वाहना ला ज़ोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा व दुचाकी वाहन चालकाचा मृत्यु झाला असुन एक महिला गंभीर जख्मी झाल्याचे सांगितले जात आहे .


सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार आज सोमवार ला दुपार च्या सुमारास दुचाकी वाहन चालक हा नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरुन मनसर कडे जात असतांना टेकाडी फाट्याजवळ एका कोळश्याचा ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन दुचाकी वाहना ला ज़ोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा व दुचाकी वाहन चालकाचा मृत्यु झाला असुन एक महिला गंभीर जख्मी झाली . सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन गंभीर अवस्थेत असलेल्या महिलेला पुढील उपचारा करिता जवाहरलाल नेहरू चिकित्सालय कांद्री येथे भर्ती करण्यात आले असुन मृत्यु झालेल्या दोघांना शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले .
सदर घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …