*गहुहिवरा ते खोपडी रोड वर बोलेरो वाहनाची सायकलला जोरदार धडक , एक गंभीर जख्मी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला बोलेरो वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

*गहुहिवरा ते खोपडी रोड वर बोलेरो वाहनाची सायकलला जोरदार धडक , एक गंभीर जख्मी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला बोलेरो वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस चार किलो मीटर अंतरावर असलेल्या गहुहिवरा ते खोपडी रोड वर एका बोलेरो पिकअप वाहनाने प्रज्वल ज्ञानेश्वर लुहरे याचा मित्र अनिकेत रामुजी दोडके च्या साईकल ला समोरून जोरदार धडक मारून झालेल्या अपघातात अनिकेत दोडके गंभीर जख्मी झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन पोलीस स्टेशन ला बोलेरो पिंकअप वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक .२ मे २०२२ ला सकाळी ५ ते ५:३० वाजता दरम्यान प्रज्वल ज्ञानेश्वर लुहुरे वय २० वर्ष राहणार गहुहिवरा कन्हान व त्याचा मित्र अनिकेत रामुजी दोडके हे दोघे ही सायकलने अपोलो करीयर अकडमी नगरधन ट्रेनिंग सेंटर येथे जात असतांना समोरून येणारी पांढऱ्या रंगाची बोलोरो पिकअप अवैद्य जनावराची वाहतुक करणाऱ्या वाहन चालका ने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन अनिकेत दोडके याच्या सायकल ला जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात अनिकेत दोडके गंभीर जख्मी झाल्याने त्याचा उपचार न्युराॅन रुग्णालय नागपुर येथे सुरू आहे . अश्या फिर्यादी प्रज्वल ज्ञानेश्वर लुहरे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात पिकअप वाहन चालका विरुद्ध अपराध क्रमांक २५५/२०२२ कलम २७९ , ३३७ , ३३८ भादंंवि सह कलम १८४ , १३४ ( अ) ( ब) वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन बोलोरो पिकअप वाहन व चालक आरोपीचा कन्हान पोलीस शोध घेत आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …