*ब्रेकिंग न्यूज* *इटगांव ( पारशिवनी ) शिवरातील बेवारस प्रेताच्या खूनाचे ३६ तासात उकळले* *स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई , तीन आरोपी अटक*

*ब्रेकिंग न्यूज*

*इटगांव ( पारशिवनी ) शिवरातील बेवारस प्रेताच्या खूनाचे ३६ तासात उकळले*

*स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई , तीन आरोपी अटक*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

पारशिवनी – पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत इटगाव , दिघलवाडी शिवारात गौरव धनराज सादतकर यांच्या शेतामध्ये एक अनोळखी पुरुषाचे बेवारस प्रेत जळालेल्या अवस्थेत मिळुन आल्याने पारशिवनी पोलीस स्टेशन ला फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३६ तासात उकळुन तीन आरोपी ला अटक करुन पुढील कारवाई करिता पारशिवनी पोलीसांना स्वाधिन केले .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक ३ मई २०२२ रोजी मौजा इटगाव , दिघलवाडी शिवारात गौरव धनराज सादतकर यांचे शेतामध्ये एक अनोळखी पुरुषाचे बेवारस प्रेत जळालेल्या अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली होती . त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस पथकाने घटनास्थळी जावून प्रत्यक्ष पहाणी केली असता नमुद अनोळखी प्रेताचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले . सदर प्रकरणा बाबत पो.स्टे . पारशिवनी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक १५८/२०२२ कलम ३०२ , २०१ , ४३६ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . सदर गुन्हयात मृतकाची ओळख पटवून अज्ञात आरोपींचा शोध घेणेबाबत नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार मगर यांनी आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात ०३ विशेष पथक गठीत करून गुन्हयाची उकल करण्याचे निर्देश दिले होते . पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे.शाखा पथकाने सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु असता तपास दरम्यान सोशल मिडीया व्हॉट्अॅपव्दारे मृतकाचे वर्णन व छायाचित्रे प्रसारीत केली होती . गुरुवार दिनांक ०५ मई २०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण चे पथक नागपूर शहरात मृतकाची ओळख पटविणे कामी फिरत असतांना गुप्त माहिती मिळाली की , पुनापुरा नागपूर येथील नितेश मुरलीधर सेलोकार वय २६ वर्षे , हा मागील ३ ते ४ दिवसापासून गायब असल्याने स्थानिक गुन्हे शाखा टिमने त्याचे घर गाठुन त्याचे फोटो दाखवुन वर्णना वरून त्याचा भाऊ मंगेश मुरलीधर सेलोकार याने ओळखून त्याचा भाऊ नितेश मुरलीधर सेलोकार असल्याचे सांगितल्याने चौकशी मध्ये नितेश हा गिरीधर उर्फ संजय सुखराम पारधी राहणार गणगौरी नगर पारडी यांचे मालकीचे ट्रकवर ड्रायव्हर म्हणुन कामाला होता अशी माहिती मिळाली व गिरीधरने त्याची गाडी चा चालक चंद्रशेखर उर्फ गोलु जगन्नाथ साहु वय २६ वर्षे राहणार पारडी नागपूर याने स्वतः तब्येत खराब झाल्याने बिलासापुर छत्तीसगड येथे गाडी घेवून जाणेकरीता नितेश सेलाकार यास आणले . तो दिनांक ११ एप्रिल.२०२२ ला गाडीत ऑईलचे बॉक्स घेवुन बिलासपुरला गेला व माल खाली केला . तेव्हा पासुन तो तिथेच होता त्यांनी रायपुर वरून गाडीत लोखंडी अँगल पाईप २५ टन माल लोड करून पिपरीया मध्यप्रदेश करीता निघाला गाडीचे टायर हे देवरी समोरील घाटात खराब झाल्याने संजय याने गोलु व आरोपी अक्षय उर्फ कमांडो भगवान मसराम वय २६ वर्षे राहणार शांतीनगर नागपूर यास सोबत घेवुन पिंटु सेलोकार यांची चारचाकी स्विफ्ट डिसायर भाडयाने घेवून गाडीने देवरी येथे जावुन गाडी दुरुस्त केली . त्या दरम्यान सर्व चारही लोकांनी मिळुन प्लानींग केले की , गाडीतील २५ टन माल बाहेर विकुन गाडी जाळुन इन्शोरस क्लैम करायाचा व त्यातुन मिळणारे पैसे चौघामध्ये वाटुन घेवु असे ठरवुन २५ टन माल कोहमारा गोंदिया रोडवर नातेवाईकाकडे उतरविला व खाली गाडी घेवून नागपूरला आणुन दुसऱ्याच दिवशी दिनांक ०२ मई२०२२ चे रात्री दरम्यान ती गाडी अक्षय याने चालविली व त्याचे सोबत नितेश कारमध्ये संयज आणि गोलु असे दोन गाडी नागपूर वरून कामठी कन्हान आमडी पारशिवनी मार्गे खापा बडेगाव रावणवाडी घाटाच्या कच्या रस्त्यात नेवून गाडीवर सोबत आणलेला डिझेल टाकुन नितेश व अक्षय ने गाडी जाळली संजय , गोलू व अक्षय यांना वाटले की नितेश हा पैसे घेवुन संपल्यानंतर फुटू शकतो व पोलीसांना सांगु शकतो असा संशय वाढल्याने त्यांनी त्याच्या काटा काढण्याचे ठरविले . त्यानंतर कार मध्ये संजय पारधी , चंद्रशेखर उर्फ गोलु साहु , अक्षय मसराम व मृतक नितेश सेलोकार असे बडेगाव खापा पाटनसावंगी , दहेगाव रंगारी , खापरखेडा मार्गे इटगाव शेत शिवार येथे घेवुन गेले व सदर परिसर हा अक्षय मसराम याचे पाहणीतील होता त्याच ठिकाणी तिघांनी मिळुन त्याचा धारदार शस्त्राने खुन करून नितेश चा मृतदेह शेजारील झोपडीतील तुराटीच्या ठिगवर ठेवुन पेट्रोलपंप पारडी येथुन विकत घेतलेल्या ४ लिटर पेट्रोल टाकुन जाळले व तेथुन पळुन गेले . आग लावताना संजय याच्या पायास जळाल्याचे निशान झाले . तसेच गोलु याचे दोन्ही पाय जळाले आहे . नंतर ते खापरखेडा मार्गे कामठी ऑटोमेटी चौक ते पारडी अशाप्रकारे ते घरी पोहचले . व नितेश याने मालासह ट्रक गायब केला असा बयाण करीत होते .
सदर प्रकरणा बाबत स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी नामे १ ) गोलू उर्फ चंद्रशेखर वल्द जगनन्नाथ शाहू वय २६ वर्ष , रा . प्लॉट नं . ४७ , माही कॉन्हेंट जवळ , साम नगर , पारडी , जि . नागपूर , २ ) गिरीधारी उर्फ संजय सुखराम पारधी वय ३५ वर्ष , रा . प्लॉट नं . १४ , गणगवरी नगर , सत्यम सोसायटी , पारडी , नागपूर आणि ३ ) अक्षय उर्फ कमांडो भगवान मसराम वय २८ वर्ष , रा . रेल्वे क्रॉसिंग , मिनी माता नगर , नागपूर यांना अटक करुन विचारफुस केली असता आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली केली व पुढील तपासा करिता आरोपी व वाहन पारशिवनी पोलीस स्टेशन ला स्वाधिन केल्याने पुढील तपास तपास पारशिवनी पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे करीत आहेत .


सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार मगर व अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे , सहायक . पोलीस निरीक्षक , राजीव कर्मलवार , जितेंद्र वैरागडे , अनिल राऊत , पोलीस हवालदार विनोद काळे , ज्ञानेश्वर राऊत , गजेन्द्र चौधरी , अरविंद भगत , दिनेश आधापूरे , निलेश बर्वे , राजेन्द्र रेवतकर , पोलीस नायक आशिष मुंगळे , शैलेश यादव , उमेश फुलबेल , विपीन गायधने , अमोल वाघ , प्रणय बनाफर , महेश बिसने बालजी साखरे , अमृत किनगे , रोहन डाखोरे , विरेन्द्र नरड चालक सहायक फौजदार , साहेबराव बहाळे , पोलीस हवालदार अमोल कुथे सह आदि ने ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …