महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांची मंत्रालयातील विधिमंडळ वार्ताहर संघासोबत पत्रकार परिषद:
–विधानसभा निवडणुकीच्या वेळेला एक विषय गरम झाला होता, तो म्हणजे आरे कारशेड. त्या आरे कारशेडच्या कामाला आज मी स्थगिती दिलेली आहे. विकास हा होणार, मी मेट्रोच्या कामाला स्थगिती नाही दिली आहे.
-शेतकऱ्यांना जो काय मी शब्द दिलेला आहे, तो शब्द मी पाळणार आहे. कारण मला दिलेला शब्द पाळायचा आहे, हे माझं आयुष्यातलं तत्व आहे.
-भगवा हा माझा जन्मभरचा आवडता कलर आहे आणि हा कोणत्याही लाँड्रीत गेला तरी धुतला जाणार नाही.
-आपल्या सर्वांचे सरकार आहे, मला एक-एक पैशाचे एक एक रुपयाचे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, माझ्या जनतेच्या एकाही पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी माझे अधिकारी घेतील.
-गेल्या महापालिका निवडणुकीत एका शब्दाची देणगी मिळालेली आहे, पारदर्शकता! त्या पारदर्शकतेने किंबहुना ‘फार’दर्शकतेने आपल्याला कारभार करायचा आहे आणि हे सरकार आपल्याला यशस्वी करायचे आहे.
असे संबोधन याप्रसंगी केले