*कन्हान परिसरात रमजान ईद उत्साहात थाटात साजरी*
*सर्व समाजातील बांधवांनी गळे मिळुन मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या*
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
कन्हान : – कन्हान परिसरातील पटेल नगर मस्जिद व कोळसा खदान नं. ३ मस्जिद येथे मुस्लिम समाजातील बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांशी गळे मिळुन, गुलाबाचे फुल देऊन ईद च्या शुभेच्छा देत रमजान ईद उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली.
कन्हान परिसरात रमजान ईद महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु गेल्या दोन वर्षापासुन कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने शासनाचे निर्बंध कडक असल्याने रमजान ईद महोत्सव नागरिकांनी आपल्या घरोघरी साजरी करण्यात आली होती. सध्या राज्या सह अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने शासनाने निर्बंध हटविल्याने नागरिकांनी रमजान ईद उत्सव शहरात उत्साहाच्या वातावरणात शेकडो च्या संख्येत मुस्लिम समाज बांधवानी रमजान ईद निमित्य पटेल नगर कन्हान मस्जिद व कोळसा खदान नं. ३ मस्जिद मध्ये जाऊन ईद उल फित्र ची नमाज अदा करून व एकमेकांशी गळे मिळुन गुलाबा चे फुल देऊन ईद च्या शुभेच्छा देत रमजान ईद उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली.
*काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा*
रमजान ईद निमित्य काॅंग्रेस पार्टी च्या पदाधिकाऱ्यानी मस्जिद जवळ जाऊन मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन ईद च्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कामगार नेते एस क्यु जामा, कॉग्रेस कमेटी नागपुर जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे, पारशिवनी तालुकाध्यक्ष दयाराम भोयर, कन्हान अध्यक्ष राजेश यादव, कांद्री उपसरपंच श्यामकुमार बर्वे, युवक कॉग्रेस चे आकिब सिद्धिकी, प्रशांत मसार महिला कॉग्रेस कन्हान अध्यक्ष रिता बर्वे, नगरसेविका रेखा टोहने सह पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते .