*ढिवर मोहल्ला पिपरी येथे पिण्याचा पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी*
*नागरिकांचे नप मुख्याधिकारी मा. चिखलखुदे हयाना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक. ६ ढिवर मोहल्ला पिपरी येथे पिण्याचा पाण्याची समस्या २० वर्षापासुन असुन मागील काही दिवसा पासुन भयंकर त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांनी नप मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांची भेट घेऊन चर्चा करित त्यांना निवेदन देऊन पिण्याचा पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली आहे.
नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत प्रभाग क्रमांक. ६ येथील ढिवर मोहल्ला पिपरी येथे जवळपास २५ ते ३० परिवार राहत असुन नगरपरिषद प्रशासन द्वारे पाणी पुरवठा होत नसुन त्या परिवारांना २०० मीटर अंतरावरून गुंडानी पाणी आणावे लागते. ही समस्या आज ची नसुन २० वर्षापासुन असुन या उन्हाळयात भंयकर त्रास सहन करावा लागत असुन सुध्दा नगर परिषद प्रशासन नागरिकांना मुलभुत सुविधा पासुन वंचित ठेवण्यात येत असल्याचे निदर्शात येत असल्या ने येथील नागरिकांनी काॅंग्रेस कमेटी महिला आघाड़ी कन्हान शहर अध्यक्षा सौ रीता बर्वे यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांची भेट घेऊन चर्चा करित निवेदन देऊन तात्काळ ढिवर मोहल्ला येथील पिण्याचा पाण्याची समस्या तात्काळ सोडवि ण्याची मागणी केली आहे.
या प्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद माजी उपाध्यक्ष व नगरसेवक योगेंन्द्र रंगारी, नगरसेवक मनिष भिवगडे, नगरसेविका रेखा टोहणे, गुंफा तिडके, प्रशांत मसार, आकाश माहतो, कृणाल खडसे, कृणाल मेश्राम, चंद्रकला मेश्राम, मिरा मेश्राम, विमल मारबते, चंद्रभागा वाढीवे, सुलोचना मारबते, रितु भोयर, उर्मिला केवट, अर्चना मेश्राम, मनिषा चौरे, अनिता सहारे, मिरा कोरवते, कांचन भुरे, सुलकन वाढिवे, साधना भोयर, कांता भोयर सह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.