*मोवाड पांढुर्णा रस्ते वर आपघाती खड्डे*
नरखेड प्रतिनिधि- श्रीकांत मालधुरे
मोवाड – शहर हे महाराष्ट्र च्या उत्तर सिमेला लागुन आहेत. यानंतर मध्यप्रदेश ची सिमेची सुरुवात होते.यामध्ये मध्यप्रदेश मधील वाहतूकचे वाहने व प्रवासी वाहतूक ही नेहमी मोवाड पांढुर्णा या क्रमांक २४५ या रस्ते वरुन रात्रन दिवस सुरू च असते. तसेच मोवाड शहरातील शेतकरी याची पण याच रस्ते वरून वाहतूक करत असते.
पण या रस्ते वर अनेक ठिकाणी मोठ्या मोठे खड्डे पटले आहेत. यामुळे कधी ही आपघात होईल हे सांगा येत नाही. हा रस्त्या नवीन निर्माण होणासाठी मंजुरी होऊन अनेक वर्षे झाल पण यांच्या अजून काम सुरू झाले नाही.
कोलार नदी वरील पुल हा अगदी च लहान आहेत. यामुळे येथुन दुहेरी वाहन जाउ शकत नाही .यामुळे अनेक वेळा या कोलार नदी मध्ये दुजाकी व जडवाहनाचा आपघात झाला आहेत.
म्हणून हा नवीन रस्ता निर्मातीचे कार्य लवकर लवकर सुरू करावे अशी मोवाड वासी जनता मागणी करत आहेत.