*मुख्याध्यापक संघा तर्फे गटशिक्षणाधिकारी हटवार यांचा सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पारशिवनी पंचायत समितीच्या नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी सौ वंदना हटवार मॅडम यांचा मुख्याध्यापक संघा तर्फे सत्कार करण्यात आला.
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर संलग्नित विदर्भ मुख्याध्यापक संघ पारशिवनी तालुक्याच्या वतीने धर्मराज शैक्षणिक परिसरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी सौ वंदना हटवार यांचा मुख्याध्यापक संघा तर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापकांनी शालेय कामकाजातील विविध विषयांवर गटशिक्षणाधिकारी हटवार यांच्याशी चर्चा करून प्रशासनास सहकार्य करण्याची हमी दिली . मुख्याध्यापकांनी शालेय कामकाजाचे नियोजन करुन काटेकोर पध्दतीने अंमलबजावणी करावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी हटवार मॅडम यांनी केले.
यावेळी संघटनेचे विभागीय सचिव व धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये, जिल्हा संघटक व विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र खंडाईत, पारशिवनी तालुका संघटक व महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री जितेंद्र भांडे कर, ग्रामीण जिल्हा संघटक व नेहा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश खोब्रागडे, महिला संघटिका व हिराबाई उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वंदना रामापुरे, धर्मराज विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री रमेश साखरकर, पर्यवेक्षक श्री सुरेंद्र मेश्राम, टिईटी जिल्हा संघटक श्री भिमराव शिंदेमेश्राम, श्री हरिष केवटे, श्री सुनील पवार, श्री प्रमोद सुरोसे आदी उपस्थित होते.