*पारशिवनी येथे दोन दिवसीय तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न* *४४१ नागरिकांनी घेतला शिबीराचा लाभ , दीड महिन्या नंतर होणार साहित्य वाटप*

*पारशिवनी येथे दोन दिवसीय तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न*

*४४१ नागरिकांनी घेतला शिबीराचा लाभ , दीड महिन्या नंतर होणार साहित्य वाटप*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वयोश्री योजना व ए.डी.आय.पी. योजने अंतर्गत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी मंगळवार दिनांक १० मई व बुधवार दिनांक ११ मई असे दोन दिवसीय तपासणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण रुग्णालय पारशिवनी येथे करण्यात आले होते .

या शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे , कार्यक्रमाचे अध्यक्ष रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते व प्रमुख अतिथि रामभाऊ दिवटे , अतुल हजारे , डॉ मनोहर पाठक , नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन शिबीर कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . या शिबीरा मध्ये एकुण ४४१ नागरिकांची तपासणी करण्यात आली असुन आॅनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले . ह्या सर्व नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजनात श्रवण यंत्रणा , व्हील चेयर , कृत्रिम मेन्डेर्चस , स्पेक्टेक्ल , एल्बो कक्रेचर्स व ट्राइपॉड्स तसेच ADIP योजनेत एल्बो कक्रेचर्स , एझलरी कक्रेचर्स , ट्राइपॉड्स , व्हील चेयर , ट्रायसायकल (मॅन्यूअल) , ट्रायसायकल (बॅटरी), कॅलिपस, कृत्री अवयव, श्रवण यंत्रणा , TLM किट, ब्रेल किट(दृष्टिहीन करिता),स्मार्ट फोन (दृष्टिहीन करिता), डेजी प्लेयर (दृष्टिहीन करिता) व स्मार्ट केन (दृष्टिहीन करिता) अशा विविध साहित्यांचे वाटप एक ते दीड महिन्या नंतर करण्यात येणार आहे .
या शिबीर कार्यक्रमात रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल , रामभाऊ दिवटे , अतुल हजारे , डॉ मनोहर पाठक , राजेंद्र शेंदरे , प्रतिक वैद्य , मनोज गिरी , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …