*नरखेड येथे नेत्राचिकित्सा व रक्तदान शिबिराचे आयोजन*
नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान आणि नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करून आणि द्वीप प्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नरखेड कृ. उ. बा. स. चे सभापती सुरेश आरघोडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा. काँ. पक्षाचे शहर अध्यक्ष संजय चरडे यांनी केले.
या प्रसंगी पं. स. नरखेड चे माजी सभापती वैभव दळवी, न. प. नरखेड चे माजी अध्यक्ष अनिल गजबे, न. प. नरखेड चे माजी उपाध्यक्ष अशपाक कुरेशी, माजी नगर सेवक सचिन चरडे, साहेबराव वघाळे, ज्ञानेश्वर मुलताईकर, रामरावजी झाडे, ठाकरे गुरुजी, जब्बार काझी, लीलाधर ठाकरे, अध्यक्ष, शेतकी खरेदी विक्री, नरखेड, मजहर खान, प्रकाश झाडे, दिनेश खत्री, अनिल रखेल, डॉ. कौस्तुभ रेवतकर, किरण इंगळे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशांत क्षीरसागर यांनी केले.
शिबिरादरम्यान एकूण 570 लोकांनी नेत्र चिकित्सा केली.
दुष्टी असेल तर सुष्टी पाहाल
या म्हणी प्रमाणे गरजु गोरगरीब जनतेला
250 रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. तसेच एकूण 27 रुग्णांना मोतियाबिंदुची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉ. कौस्तुभ रेवतकर यांनी सांगितले. यातील निराधार आणि दारिद्रीरेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया केली जाईल तर उर्वरित लोकांचे 2 ते 5 हजार रू खर्चाने शस्त्रक्रिया केली जाईल.
नेत्र चिकित्सेसाठी नागपूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रशांत बावनकुळे यांची सारक्षी नेत्रालय, नागपूर येथील तज्ज्ञांची टीम होती.
या शिबिरात आयोजित रक्त दान श्रेष्ठ दान एक व्यक्ती रक्त देतो दोघाचे प्रणा वाचवतो रक्तदान शिबिरात एकूण 25 रक्तादात्यांनी रक्तदान केले.
रक्तसंकलानासाठी नागपूर येथील हेडगेवार रक्तपेढी ची टीम उपस्थित होती.
शिबिराच्या आयोजनासाठी प्रा. नरेश तवले, योगेश मांडवेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काटोल विधानसभा अध्यक्ष उदयन बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पंकज क्षीरसागर, अजय सोमकुवर, आकाश जवादे, नेहाल अरखेल, गौरव गुरमुळे, किशोर खंडारे, संजय दामेधर, नरेंद्र रहाटे, प्रवीण तिजारे, ईश्वर रेवतकर, हर्षल दामेधर, महेश मानकर, मंगेश काळकर आदी