*कन्हान ला राजे संभाजी महाराज यांची ३६५ वी जयंती थाटात साजरी*
*मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड कन्हान द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड कन्हान द्वारे राजे संभाजी महाराज यांच्या ३६५ व्या जयंती थाटात साजरी करण्यात आली .
शनिवार (दि.१४) मे २०२२ ला मराठा सेवा संघ कार्यालय रेंघे पाटील भवन तारसा रोड कन्हान येथे राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष मा शांताराम जळते व ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या अलौकीक कार्य शैलीवर मार्गदर्शन करून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यास संभाजी महाराजाचा ख-या इतिहास अवगत करून दिला तर एक आदर्श व प्रचंड ऊर्जा असलेले युवा आपल्या कुंटुबासह देशाचे नाव लौवकीक करणारी पिढी घडविण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे ताराचंदजी निंबाळकर , राजेंद्र मसार , राजुजी रेंघे , वसंतराव इंगोले , संभाजी ब्रिगेड कन्हान चे राकेश घोडमारे , अमोल डेंगे , रजनिश मेश्राम , ऋृतिक रेंघे , सुमित खैरकार , आशिष इंगोले , उत्कर्ष रहाटे सह आदी प्रामुख्याने उपस्थित होते.