*भाजपा द्वारे बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भाजपा कन्हान शहर द्वारे बुद्ध पौर्णिमा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गणेश नगर बुद्ध बिहार येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा अनुसूचित जाति मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बौद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी सुनील लाडेकर , भरत सावळे , विनायक वाघधरे , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका संगीता खोब्रागडे , सुषमा चोपकर , सुषमा मस्के , प्रतीक्षा चवरे , कामेश्वर शर्मा , विक्की सोलंकी , रंजीत शिंदेकर , संजय चोपकर , उपासराव खोब्रागडे , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .