*कांद्री ला गौतम बुद्ध मुर्ती बोधीसत्व बौद्ध विहारात स्थापना करून विहाराचे उद्घाटन*
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
कन्हान : – यशोधरा महिला मंडळ कांद्री द्वारे बुध्द पोर्णिमा भगवान गौतम बुद्धाची मुर्ती स्थापना करून बोधीसत्व बौद्ध विहाराचे उद्घाटन करून बुध्द जयंती कांद्री ला थाटात साजरी करण्यात आली.
रविवार दिनांक .१५ मे २०२२ ला कांद्री येथे बुद्ध पौर्णिमा निमित्य यशोधरा महिला मंडळ कांद्री द्वारे गौतम बुद्धाची मुर्ति स्थापना व बोधीसत्व बौद्ध विहारा चे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . यावेळी सकाळी वार्ड नंबर ३ आंबेडकर नगर कांद्री येथुन धम्मरॅली काढुन ही रैली संपुर्ण कांद्री शहराचे भ्रमण करून परत आंबेडकर नगर कांद्री येथे धम्मरॅलीचे समापन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मा. श्री सुनिल केदार (पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य , मा.राजेंद्र मुळक माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटी, सौ.रश्मीताई बर्वे अध्यक्षा जि.प.नागपुर, बळवंत पडोळे सरपंच कांद्री यांच्या प्रमुख उपस्थितीत अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे, दया, क्षमा, प्रेम व शांतीची शिकवण देणारे विश्व वंदनीय भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्य गौतम बुध्द मूर्ती स्थापना करून बोधीसत्व बौद्ध विहाराचे उद्घाटन करित मान्यवरांनी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुष्प अर्पित करून उद्घाटन करण्यात आले . या वेळी मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी पंचायत समिति पारशिवनी सभापती मीनाताई कावळे, नरेश बर्वे, दयाराम भोयर, बळवंत पडोळे, गणेश पानतावणे, श्यामकुमार बर्वे, शशिकला बागडे, कल्पना पानतावणे, आशाताई कनोजे, शंकर चहांदे, वासुदेव वानखेडे, शंकरजी वाहाने, प्रफुल कावळे, बैसाखु जनबंधु, महेश झोडावणे, राहुल टेकाम , गणेश सरोदे, आकिब सिद्धिकी, अजय कापसीकर, निखिल तांडेकर, आनंद चकोले, चंदाताई बागडे, यमु कला वानखेडे, रंजनाताई मेश्राम, विद्याताई पानताव णे, दिलीप गजभिये, प्रकाश वरखडे, सागर वानखेडे, सूर्यभान गजभिये, ज्ञानेश्र्वर सहारे, नरेंद्र मेश्राम सह आदी भीम प्रेमी व नागरिक आवर्जून बहु संख्येने उपस्थित होते.