*कन्हान येथे आचार्य बाळशास्री जांभेकर यांना दिली श्रद्धांजलि* *कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे आचार्य बाळशास्री जांभेकर यांना दिली श्रद्धांजलि*

*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या १७६ व्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोरील ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व श्रद्धांजलि अर्पित करुन आचार्य बाळशास्री जांभेकर यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .

बुधवार दिनांक १८ मे ला मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या १७६ व्या पुण्यतिथि निमित्य शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोरील ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित वरिष्ठ पत्रकार कमल सिंह यादव , पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते , मंच मार्गदर्शक भरत सावळे प्रभाकर रुंघे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी , पत्रकार बांधवांनी व नागरिकांनी आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजलि अर्पित करुन आचार्य बाळशास्री जांभेकर यांची १७६ वी पुण्यतिथि साजरी करण्यात आली .

या प्रसंगी नागपुर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मोतीराम रहाटे , कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव सुरज वरखडे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , हरीओम प्रकाश नारायण , रवि दुपारे , आकाश पंडितकर , रोहित मानवटकर , सह आदि नागरिक उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …