*निराधार योजनेचे प्रलंबित प्रकरणे मंजूर करा* – *भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांची नायब तहसिलदार यांच्याकडे मागणी*

*निराधार योजनेचे प्रलंबित प्रकरणे मंजूर करा*

*भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांची नायब तहसिलदार यांच्याकडे मागणी*

आवारपूर  प्रतिनिधि – गौतम धोटे

आदिवासी बहुल कोरपना तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित प्रकरणे असून ते तात्काळ मंजूर करण्यात यावे अशी मागणी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी श्री.विनय कौलवकर नायब तहसिलदार यांना केली आहे.
कोरपना तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरणे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत, ९ सप्टेंबर २०१९ रोजी शेवटची संजय गांधी निराधार योजनेची बैठक पार पाडली,परंतु त्यांनतर २ महिने २१ दिवसानंतर एकही बैठक झालेली नाही त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे अर्ज मंजुरीकरिता प्रलंबित आहे,सध्या स्थितीला जवळपास ३०० च्या वरती प्रकरणे प्रलंबित आहेत.त्यामुळे लाभार्थ्यांना सदर बाबीचा फटका बसत आहे,त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे,
मधल्या काळात निवडणूकीमुळे आचार संहिता व त्यानंतर राष्ट्रपती राजवटीमुळे सदर प्रकरणे मंजूर होऊ शकली नाही नाहीत,परंतु आता नवीन शासन राज्यात स्थापन झाल्यामुळे संजय गांधी निराधार योजनेची बैठक घेण्यात येऊ शकते त्यामुळे सदर योजनेची बैठक घेऊन सर्व प्रलंबित प्रकरणे मंजूर करून लाभार्थ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी नायब तहसिलदार श्री. विनय कौलवकर यांना केली आहे.
तसेच आपण येत्या एका हप्त्यात सदर बैठकीचे आयोजन करून सदर प्रकरणे निकाली काढू असे आश्वासन नायब तहसीलदार यांनी यावेळी आशिष ताजने यांना दिले आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …