*राज्य स्तरिय तिरंदाजी स्पर्धेत जीनात गजभिये ला कास्य पदक*

*राज्य स्तरिय तिरंदाजी स्पर्धेत जीनात गजभिये ला कास्य पदक*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – राज्य स्तरीय तिरंदाजी स्पर्धा हिंगोली येथे संपन्न होऊन यात नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करित कुर्वे आर्चरी क्लब नागपूर चा तिरंदाज जीनात गजभिये याने नऊ वर्षांवरील वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करीत कास्य पदक मिळवुन राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे.


बुधवार (दि.१८) मे २०२२ ला महाराष्ट्र राज्य तिरंदाजी असोसीएशन द्वारे हिंगोली येथील बरसत येथे राज्य स्तरीय तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील एकुण २४० तिरंदाज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. राज्य स्तरीय तिरंदाजी स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील प्रतिनिधीत्व केलेल्या कुर्वे आर्चरी क्लब नागपूर येथील तिरंदाज (Archer) जिनात राहुल गजभिये याने नऊ वर्षांवरील वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करीत कास्य पदक प्राप्त करून राजामुंद्री (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत स्थान प्राप्त करित प्रवेश निश्चित केला आहे. स्पर्धेचे आयोजन रंगाराओ साळुंके हयानी केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनचे उपाध्यक्ष अँड.भिमराव गजभिये यांचा नातु जिनात मुळे नागपूरचे नाव हे राज्य पातळी वर चमकले असुन जिनात च्या यशामध्ये त्याच्या पालकांचे आणि कुर्वे आर्चरी कल्ब नागपूरचे मुख्य प्रशिक्षक देवीदास कुर्वे यांचा मौलाचा वाटा आहे. तसेत संदीप काळे, सत्यजीत सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र तिरंदाजी असोसिएशन्सचे सचिव प्रमोद चांदूरकर हयानी स्पर्धेचे संचालन आणि आभार प्रदर्शन रंगाराओ साळुंके हयांनी केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …