*बंद पडलेले कँसीनो सेंटर सुरु करण्याच्या हलचलींना वेग*
*धाड़सत्रात भुमीगत झालेले संचालक पुन्हा सक्रिय*
*तक्रारकत्यास दमदाटी मुळे भितीचे वातावरण*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले व्दारा*
*सावनेरः विद्यार्थी, युवावर्ग व गोरगरिबांचे जिवन व परिवार उध्वस्त करणार्या अवैध कँसीनो सेंटर च्या विरोधात महाराष्ट्र न्यूज मीडिया व इतर सोशल मीडिया व्दारे सातत्याने बातम्या प्रकाशित केल्याने स्थानिक पोलीस प्रशासनाने हरकतीत येऊण एका कँसीनो सेंटर वर धाड घालुन एक लक्ष बासष्ट हजार रुपयांचा ऐवजा सह दोन आरोपींना अटक केल्याने सदर अवैध कँसीनो संचालकांचे धाबे दणानले आहे व पोलीस कारवाई पासुन बचावन्या करिता आप आपले कँसीनो सेंटर बंद करुण भुमीगत झाले होते ते आता परत सक्रिय होऊन शहरातील काही स्वयंभू नेते मंडळी व समाजसेवींना पोटाशी धरुण आपले बंद पडलेले कँसीनो सेंटर परत सुरु करण्याच्या तयारीला लागले असल्याचे वु्त्त आहे*
*महाराष्ट्र न्यूज मीडिया व इतर सोशल मीडिया च्या पुढाकाराने शहरातील अवैध कँसीनो सेंटर बंद पडल्याने शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण असुन अनेक सुजान नागरिक व पीडित परिवारांने याचे स्वागत करत अभिनंदन व्यक्त करत सदर व्यवसाय पुर्णपने कायमचा बंद व्हावा असा सुर धरून ठेवला असला तरी अनेकांचा संसार उघड्यावर आणनारा तसेच विद्यार्थी व युवा वर्गाच्या तसेच मोल मजूरी करणार्यांचे व त्यांच्या मुला बाळांचे जिवन उध्वस्त करुण आपल्या महाल माड्या उभारण्यात गुंग असलेल्या काही मोजके अवैध कँसीनो संचालक सदर अवैध जीवघेणा व्यवसाय परत थाटन्या करिता शर्तीचे प्रयत्न करत असल्याचे तसेच सदर व्यवसाय सुरु करवून घेण्यास मोठ मोठ्या नेते मंडळीचे उंबरठे झिजवत असल्याचे खात्रीलायक वु्त्त आहे.*
*तक्रार कर्त्यास दमदाटी मुळे भीतीचे वातावरण*
*शहरात फोफावत असलेल्या सदर अवैध कँसीनो व्यवसायाच्या विरोधात इरशाद शाह याने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना लेखी तक्रार करुण सदर अवैध व्यवसायावर आळा घालुन बंद करण्यात यावे असे आपल्या तक्रारीतून मागणी केल्याने तसेच सोशल मीडिया व महाराष्ट्र न्यूज मीडियाने सदर प्रकरण सदर प्रकरण लावून धरल्यामुळे झालेली कारवाई व याऊपर सदर तक्रार कर्याने वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारी मुळे आपले आता खैर नाही व आपला लुट व फसवणूकीचा व्यवसाय कायमचा बंद होण्याच्या मार्गावर दिसत असल्याने सदर अवैध कँसीनो संचालकांनी आता तक्रारकर्त्यांच्या घरी जाऊन त्याला दमदाटी करत असल्याचे खात्रीलायक वुत्त असुन सदर घटनेची तक्रारकर्त्याने अवैध कँसीनो सेंटर च्या संचालकांच्या विरोधात पोलीसांना तक्रार केल्याचीही माहिती पुढे येत आहे*
*एकीकडे दबंग अश्या अवैध व्यवसाईकांच्या विरोधात तक्रारी नोंदविण्यास कुणी पुढाकार घेत नाही त्याला कारणं ही वरिल प्रमाणेच असतात अश्यात अगर सदर अवैध कँसीनो संचालक तक्रारकर्तेक्षव त्याच्या परिवारास अश्या दमदाट्या देऊण विठीस घरत असल्या यापुढे अश्या अवैध व्यवसाईकांच्या विरोधात तक्रारी करण्यास पुढाकार घेणार कोण…? करिता पोलीस प्रशासनाने तक्रारकर्त्यास पोलीसांनी योग्य संरक्षण देऊण अवैध कँसीनो व्यवसाईकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे*
*ऐकीकडे अवैध कँसीनो संचालकांनी आपले कँसीनो सेंटर सुरु करण्याचे प्रयत्न,तक्रारकर्त्यास दमदाटी करुण तक्रार मागे घेण्याकरीता अथव्या चुकीच्या गुन्ह्यात फसवीण्याकरीता सर्वंच स्तरावरुण वापरल्या जात असलेल्या दबाव तंत्राला सुरुवात झाली असल्याने पिडित व त्याच्या परिवारात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.पोलीस प्रशासनाने सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊण सदर अवैध कँसीनो संचालक व त्यांच्या हस्तकांवर कठोर कारवाई करुण परत सदर कँसीनो सेंटर नव्याने सुरू होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी सर्वच स्तरावरुन जोर धरत आहे…*
*पुढे क्रमश्….*
*