*कन्हान येथे भारतरत्न स्व.राजीव गांधी यांना दिली श्रद्धांजली* *कन्हान युवक काँग्रेस द्वारे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे भारतरत्न स्व.राजीव गांधी यांना दिली श्रद्धांजली*

*कन्हान युवक काँग्रेस द्वारे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या ३१ व्या पुण्यतिथी निमित्य कन्हान युवक काँग्रेस द्वारे श्रध्दाजंली कार्यक्रमाचे आयोजन करून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दोन मिनटाचा मौनधारण करून श्रद्धांजली अर्पन करित स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले.
शनिवार दिनांक .२१ मे ला पुर्व प्रधानमंत्री, संगणक क्रांती चे जनक, युवकांचे प्रेरणास्थान, आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या ३१ व्या पुण्यतिथी निमित्य कन्हान युवक काँग्रेस द्वारे माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी मा. राजेन्द्रजी मुळक यांचा जनसंपर्क कार्यालयात युवक काँग्रेस च्या पदाधिकार्यांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व युवक काॅंग्रेस च्या पदाधिकार्यांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून तसेच दोन मिनटा चे मौनधारण करित श्रद्धांजली अर्पण करून स्मृती दिनी अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कन्हान- पिपरी नगरपरिषद नगरसेविका रेखा टोहणे, आकिंब भाई सिद्दीकी, अजय कापसिकर, पंकज गजभिये, सोहैल सैय्यद, अनस शेख, धनराज चकोले, आनंद चकोले, महेश धोगडे, मोनु खान, शाहनंद शेंडे, सुनील आंबागडे सह युवक कांग्रेस व कॉग्रेस कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …