*ट्रॅक्टर वरून नियंत्रण सुटल्याने चालकाचा मृत्यु*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या शाहानी ट्रेडर्स जवळुन मृतक आपल्या ताब्यातील ट्रॅक्टरने पाण्याचे टँकर घेऊन कन्हान कडे जात असतांना ट्रॅक्टर वरून नियंत्रण सुटुन टँकटर पलटी झाल्याने चालकाचा कमरेला, पाठीच्या मनकेला व चेहऱ्याला मार लागुन जास्त रक्तस्राव झाल्याने चालक सचिन शिंदे चा घटनास्थळी मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३१ /जी १३६२ चा चालक मृतक सचिन साहेबराव शिंदे,राहणार संताजी नगर कांद्री कन्हान हा शनिवार दिनांक .२१ मे ला सकाळी ८ ते ८:१५ वाजता दरम्यान आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर ने मागील बाजुस पाण्याचे टॅंकर घेऊन कांद्री कडुन कन्हान कडे जात असतांना वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवित असल्याने कांद्री बस स्टाप जवळ अचानक ट्रॅक्टर वरील नियंत्रण बिघडल्याने ट्रॅक्टर चे मागील बाजुस असलेले टॅंकर ट्रॅक्टर पासुन वेगळे होऊन महामार्गा च्या बाजुन श्रला ट्रॅक्टर चे मुंडके पलटी झाल्याने त्यास कमरेला , पाठीच्या मनकेला व चेहऱ्याला जबर मार लागल्याने जागीच ट्रॅक्टर चालक सचिन शिंदे चा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी सरकार तर्फे पोलीस नापोशि यांच्या तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला कलम २७९, ३०४ ए भादंवि मो वा कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.