*संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समिती युवा जिल्हाध्यक्ष पदी पंकज नांदुरकर ची नियुक्ती* *सामाजिक कार्यकर्ता व मित्रांनी पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार*

*संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समिती युवा जिल्हाध्यक्ष पदी पंकज नांदुरकर ची नियुक्ती*

*सामाजिक कार्यकर्ता व मित्रांनी पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – संत गाडगे बाबा जयंती उत्सव सेवा समिती महाराष्ट्र राज्य नागपुर जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष पदावर कांद्री रहिवासी पंकज नांदुरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पंकज नांदुरकर यांच्या निवास स्थानी त्यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


संत गाडगे बाबाच्या विचारांने प्रेरित होऊन पंकज नांदुरकर मागील अनेक दिवसापासुन सामाजिक क्षेत्रात कार्य करित असल्याने त्या कार्याची दखल घेऊन संत गाडगे बाबा जयंती उत्सव सेवा समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल शिंदे व त्यांच्या संपुर्ण कार्यकारणीने सर्वानुमते कांद्री रहिवासी पंकज नांदुरकर यांची संत गाडगे बाबा जयंती उत्सव सेवा समिती महाराष्ट्र राज्य नागपुर जिल्हा ” युवा जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती ने शहरातील व परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पंकज नांदुरकर यांचे निवास स्थान कांद्री येथे जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करित पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …