*बेलोना येथे योग प्राणायाम शिबीर*

*बेलोना येथे योग प्राणायाम शिबीर*

नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – श्री संत गजानन महाराज मंदिराच्या भव्य प्रांगणात या शिबीराचे ग्रामगीताचार्य ज्योती बन्सोड मॕडम यांनी आयोजन केले आहे .गावातील महिलांंना सुदृढ ,स्वस्थ ,निरोगी आरोग्य प्राप्त व्हावे या उद्देशाने या शिबीराचे आयोजन केलेले आहे.

हे शिबीर सकाळी पाचला सुरू होत असून साडेसहा पर्यत चालते .याशिबीराला सौ.वनिता रामदे,दुर्गा नागपूरकर,वनिता नागपूरकर,हेमलता सातपुते पं.समिती सदस्या,संगिता सातपुते ,कविता रेवतकर,वंदना मेंढे,जया दिवान,सोनू बोरकर,शोभा रेवतकर,माधुरी बन्सोड,राधीका धुर्वे,मोहिनी हेडाऊ,लता सातपुते ,सुरेखा कांबळे,प्रणिता ठोंबरे ,इ.महिलांचा चागला सहभाग मिळत आहे.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अनेक महिलांनी पुढाकार घेतलेला आहे.आचार्य ज्योती बन्सोड या योगा शिक्षिका म्हणून कार्य करीत आहे.याचा सर्व बेलोना नगरीतील महिलांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी सांगितले आहे.हे शिबीर निशुल्कपणे चालत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …