*तामसवाडी शिवारात अवैध देशी दारु च्या निपा विक्री करणाऱ्या आरोपीला पकडले*
*स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई , आरोपीच्या ताब्यातुन देशी दारुच्या निपा व एक मोपेड दुचाकी वाहना सह एकुण ५४,४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
पारशिवनी – तालुक्यातील पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीत मौजा तामसवाडी शेत शिवारात स्थानिक गुन्हे शाखा पथक पेट्रोलिंग करत असतांना गोपनीय बातमी दाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचुन अवैधरित्या देशी दाऊ विक्री वर धाड मारुन कारवाई करुन एका आरोपी ला ताब्यात घेऊन त्याचा जवळून देशी दारुच्या निपा व एक मोपेड दुचाकी वाहना सह एकुण ५४,४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाई करिता पारशिवनी पोलीसांना स्वाधिन करण्यात आले .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक २५ मई ला स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे पथक रामटेक उपविभागा अंतर्गत अवैध धंदयावर आळा घालणेकामी पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारा कडुन माहिती मिळाली की पोलीस स्टेशन पारशिवनी हद्दीतील तामसवाडी शेत शिवारातील पप्पी अरोरा यांचे विट भट्टयाजवळ एक इसम पांढऱ्या रंगाची मोपेड वर अवैधरित्या देशी दारु ची विक्री करीत आहे . अश्या विश्वसनीय माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखा पथक स्टॉप सोबत पारशिवनी शेत शिवारात सापळा रचुन रेड कार्यवाही केली असता सदर इसम नामे नागसेन गुरूदे चव्हान हा आपले मोपड क्रमांक.एमएच ४० सीजे ८८७४ च्या डिक्कीत व पायदाना समोर एका प्लॉस्टीक थैलीमध्ये देशी दारू अवैधरित्या विनापरवाना बाळगुन विक्री करीतांना मिळुन आल्याने त्याचा ताब्यातुन देश दारू १८० एमएल च्या ४४ निपा किंमत ४,४०० रूपए व मोपेड दुचाकी वाहन क्रमांक.एमएच ४० सीजे ८८७४ किंमत ५०,००० रुपए असा एकुण ५४,४०० रुपयाचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी नागसेन गुरूदेव चव्हा वय ४३ , रा . तामसवाडी याचे विरूध्द पोलीस स्टेशन पारशिवनी येथे महा दारूबंदी कायद्या अन्वये गुन्हा नोंद करून पुढी कार्यवाही करीता पोलीस स्टेशन पारशिवनी यांचे ताब्यात देण्यात आले .
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार मगर , अपर पोलीस अधीक्ष राहुल माकणिकर यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी , पोलीस नाईक रोहण डाखोरे , अमोल वाघ , अमोल कुथे यां पथकाने पार पाडली .