*धर्मराज प्राथमिक शाळेच्या रौप्य महोत्सवा निमित्त शाळेला भेट वस्तु प्रदान*
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
कन्हान : – धर्मराज प्राथमिक शाळेच्या २५ वर्ष पुर्ती निमित्त रौप्य महोत्सव सुरू आहे. शनिवार (दि. २८) ला या रौप्य महोत्सवा निमित्त भाजप भटके-विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व रोटी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ रोहित माडेवार यांनी धर्मराज प्राथमिक शाळेला भेट दिली. शाळेच्या प्रगती बद्दल चौकशी करून शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन रौप्य महोत्सवा निमित्त धर्मराज प्राथमिक शाळेला ६ खुर्ची व २ टेबल भेट वस्तु म्हणुन प्रदान करण्यात आल्या. लवकरच विद्यार्थ्यांसाठी क्रिडा साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, भाजप भटके-विमुक्त आघाडीच्या नागपुर जिल्हाध्यक्ष श्रीमती सिमा कश्यप उपस्थित होते.