*नवउदयोजकता मार्गदर्शन कार्यशाळा कन्हान ला संपन्न*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – डॉ आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कन्हान येथे नवउदयोजकता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
प्रशासकीय नविन ईमारत नगरपरीषद कन्हान-पिपरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे व महाराष्ट्र विकास केंद्र हिंगणा -२ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त नवउद्योजकता मार्गदर्शन एक दिवसीय कार्यशाळा नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांचे अध्यक्षेत, प्रमुख अतिथी मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुंदे, मार्गदर्शक राज्य समन्वयक कौशल्य विकास विभाग बार्टी, पुणे मा. हेमंत वाघमारे, समतादुत प्रकल्प अधि कारी बार्टी नागपुर मा. हृदय गोडबोले, नगरसेविका कल्पना नितनवरे यांच्या प्रमुख उपस्थित महामानवां च्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यशाळा सुरूवात करण्यात आली. समतादुत प्रकल्प पारशिवनी अंतर्गत निर्मित अनुसुचित जातीच्या स्वय युवा गटातील नव उद्योजकता तरूणांना सहाय्यता, स्वयरोजगार करण्यासाठी हेमंत वाघमारे सरांनी परिसरातील १४ ते ४० वर्ष वयोगटातील युवा पिढीस उद्योजक तयार होण्याचं मुलमंत्र त्यासाठी लागणारी प्राथमिक मानसिकता व व्यवसायाची निवड आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग योजना, बार्टी तसेंच सामाजिक न्याय विभाग योजना विषयी मार्गदर्शन करून युवकांना आणि इतरांना देखील रोजगार देता येईल इतके सक्षम हा असा संदेश दिला. कार्यक्रमास नगरपरिषद मुख्या धिकारी श्री मा.राजेद्र चिखलखुंदे सरांचे मौलाचे सह कार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचाल न समतादुत पारशिवनी शुभांगी टिंगणे यांनी तर आभा र प्रदर्शन सुनिता गेडाम हयांनी केले. कामठी तालुका समतादुत सह बार्टी अंतर्गत निर्मित युवा गटातील सदस्य, महिला, पुरूष तसेच युवा नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.