*मरियम अम्मा दर्गा गाडेघाट येथे तीन दिवसीय वार्षिक उर्स मोठ्या उत्साहात थाटात साजरा*

*मरियम अम्मा दर्गा गाडेघाट येथे तीन दिवसीय वार्षिक उर्स मोठ्या उत्साहात थाटात साजरा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरा पासुन पश्चिमेस ४ किलो मीटर अंतरावर असलेल्या गाड़ेघाट येथील हुजूर मरियम अम्मा दर्गा येथे १५० वा तीन दिवसीय वार्षिक उर्स मिलाद शरीफ, शाही संदल विविध कार्यक्रमाने व महाप्रसाद वितरण करून वार्षिक उर्स मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला .


हुजूर मरियम अम्मा दर्गा गाड़ेघाट येथे १५० वा तीन दिवसीय वार्षिक उर्सचे शनिवार (दि.२८) मे २० २२ ला मिलाद शरीफ कार्यक्रमाने उर्सची सुरूवात करण्यात आली असुन रविवार (दि.२९) मे ला दुपारी १ वाजता दर्ग्या पासुन शाही संदल काढण्यात आला. हा संदल कन्हान शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकातुन रेल्वे स्थानक परिसरात पोहचले असता तिथे संत बाबा ताजुद्दीन दर्गा ताजबाग नागपुर येथील संदल सहभागी होऊन दोन्ही संदल मिळून रेल्वे माल धक्का , गहुहिवरा रोड चौक , तारसा चौक , आंबेडकर चौकातुन पिपरी मार्गे गाड़ेघाट येथे पोहचला असता सायंकाळी ६ वाजता परचम कुशाई नंतर हुजूर मरियम अम्मा यांना शाही चादर चढवुन महाप्रसाद वितरण करण्यात आला . सोमवार (दि.३०) मे ला सकाळी क़ुराण खानी, कुल शरीफ फातेहा करून उर्सचा समारोप करण्यात आला. या तीन दिवसीय उर्स च्या कार्यक्रमास कन्हान परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन उर्स चा लाभ घेतल्याने सज्जादानशीन ताजी तब्रेजुद्दीन, ताजी तनवीरूद्दीन व ताजी मुस्तफीजुद्दीन हयांनी सर्व उपस्थित भाविक भक्त नागरिकांचे आभार व्यक्त केले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …