*फसवणुक प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना ३४ मध्ये सह आरोपी बनविण्याची मागणी*
*राष्ट्रवादी काॅंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे चे पोलीस निरिक्षका मार्फत गृहमंत्री ला निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान येथील रहिवासी विजय खंडेलवार यांना विश्वासात घेऊन राजल वेद याने गुंतवणुकीचे प्रलोभन देऊन त्यांच्या कडुन थोडे – थोडे करित जवळपास ६१ लाख रूपये घेऊन फसवणुक केल्या प्रकरणी कन्हान पोलीस विभागा द्वारे ५ महिने लोटुन सुद्धा सदर प्रकरणात दिरंगाई करत असल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे च्या नेतृत्वात शिष्ट मंडळाने पोलीस निरीक्षक विलास काळे यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करून त्यांचा मार्फत गृहमंत्री यांना निवेदन पाठवुन फसवणुक प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या अधिका-या वर ३४ मध्ये सह आरोपी बनविण्याची मागणी केली आहे .
कन्हान येथील रहिवासी विजय बाबुलाल खंडेलवाल यांना विश्वासात घेऊन गैरअर्जदार राजल मोहित वेद रा.नागपुर ह्याने कंपनी मध्ये गुंतवणुक करा आणि महिन्यासाठी ३०% रिटर्न मिळवा असे गुंतवणुकीचे प्रलोभन देऊन त्यांच्या कडून थोडे – थोडे करित ६१ लाख रूपये घेतले. मात्र पैसे परत मागितल्यावर दिले नाही. सदर प्रकरणा बाबत अर्जदार विजय खंडेलवार यांनी कन्हान पोलीस स्टेशन ला (दि.७) जानेवाली २०२२ रोजी लेखी तक्रार करून सोबत स्टेट बँकेचे स्टेटमेंट, सीए चा रिपोर्ट व गुन्हा दाखल करण्यासाठी लागणारे आवश्यक सर्व कागदपत्रे दस्त तक्रारी बरोबर दिलेले आहे. परंतु सदर प्रकरणात कन्हान पोलीसा द्वारे पाच महिने लोटुन सुद्धा प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचा भुमिकेतुन कुठेही तत्परता न दाखवता प्रकरण पोलिसां मार्फत प्रलंबित ठेऊन दिरंगाई केली जात आहे. सदर भुमिका आरोपीला वाचविण्याच्या दुष्टीकोनातुन तपासी सक्षम अधिकारी करीत असुन त्या तापासी अधिकाऱ्यावर तात्काळ भुलक्षी प्रवाहाने गुन्हा दाखल करून त्याला ३४ मध्ये सह आरोपी बनविण्यात यावे. व या प्रकरणात सन्मानिय पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामिण यांनी विशेष लक्ष्य केंद्रीत करून पोलिसांवर होणारे आरोप प्रत्यारोप याला तात्काळ प्रकरणातुन दुर सारण्याची भूमिका घेण्यात यावी.अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे च्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन पाठवुन केली आहे. अन्यथा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी द्वारे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे .