*जागतिक तंबाखू निषेध दिवस संपन्न*
सावनेर – दि 31 मे विश्व तंबाखू निषेध दिवसाच्या निमित्ताने प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेवाकेंद्र सावनेर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमास नगरीतील मान्यवर व सेवाकेन्द्राचे साधक साधिका प्रमुख्याने उपस्थित होत्या.
*सावनेर ब्रम्हकुमारी सेवा केंद्रा च्या संचालिका ब्रह्मा कुमारी सुरेखा दिदी ने उपस्थित सर्व बंधू भगीनी कडून तंबाखू सेवन न करण्याची शपथ करवून घेतली. प्रसंगी केंद्रात शेकडो महिला पुरुषांनी उपस्थित राहून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ न खाण्याची तसेच परिवारात कुनी खात असेल तर त्यांना ही तंबाखू मुळे होत असलेल्या जिवघेण्या आजारांची माहीती देत तंबाखू सोडण्याकरिता प्रवु्त्त करण्यासाठी सर्वांनी शपथ विधी ग्रहण केला.*
*आयोजनाच्या यशस्वीतेकरिता ब्रम्हकुमार अनिल ढवळे,ब्रम्हकुमारी प्रीयंका दीदी आदींने परिश्रम घेतले*