श्री नरेंद्र तिडके महाविद्यालयात स्वच्छता अभियान
रामटेक प्रतिनिधि -ललित कनौजे रामटेक
रामटेक:श्री नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेकच्या एनसीसी पथकाच्या वतीने महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी एस. एन. टी. कॉलेजच्या एनसीसी कॅडेटना सर्वप्रथम स्वच्छतेची शपथ प्राचार्य डॉ.संगीता टक्कामोरे यांनी दिली या प्रसंगी एनसीसी विभागाचे डाॅ. बाळासाहेब लाड उपस्थित होते एनसीसी कॅडेट्सनी महाविद्यालय परिसराची संपूर्ण स्वच्छता केली. स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत गुडघे ,पुंडलिक राऊत, शुभम लिल्हारे यांनी परिश्रम घेतले.