*महामार्गा वरील विद्युत डी.पी ला आग लागुन महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान* *महामार्गा फुटपाथ वर दुकानदाराचे अतिक्रमण , डीपी जवळ कचरा व सामोर ठेल्याचे अतिक्रण*

*महामार्गा वरील विद्युत डी.पी ला आग लागुन महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान*

*महामार्गा फुटपाथ वर दुकानदाराचे अतिक्रमण , डीपी जवळ कचरा व सामोर ठेल्याचे अतिक्रण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा लगत तनु इलेक्ट्रीक कन्हान च्या बाजुला असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मर डीपी ला भर दुपारी आग लागुन विद्युत वायर जळुन या आगीत डिपी व स्टेट लॉईट ची वायरिंग जळुन भारी नुकसान होऊन विद्युत लाईन बंद झाल्याने या नवतप्याच्या आठव्या दिवसी भर दुपारी नागरिकांना विद्युत बंद झाल्याने भंयकर त्रास सहन करावा लागला.

कन्हान – पिपरी नगर परिषद अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी सिमेंट महामार्ग असुन पोलीस स्टेशन ते नाका नंबर ७ पर्यंत दोन्ही बाजुच्या फुटपाथ वर दुकान दारांचे दिवसेन दिवस अतिक्रमण वाढुन सुध्दा नगरपरिषद प्रशासन उघडया डोळयांनी फक्त पाहण्याचे काम करित आहे. बुधवार (दि.१) जुन ला दुपारी १ वाजता दरम्यान आंबेडकर चौका जवळील महामार्गा लगत तनु इलेक्ट्रीक च्या बाजुला होम पाईप च्या कंपाऊड भितीला लागुन असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मर (डी पी) ला आग लागुन जोराचा धमाका होऊन विद्युत लाईन ट्रिप झाल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु डिपी व स्टेट लाईटींग चे तेथे असलेले वायर जळुन ट्रान्सफार्मर चे सुध्दा मोठया प्रमाणात नुकसान झाले. या ट्रान्सफार्मर डीपी च्या सामोर महामार्गाच्या फुटपाथ वर दुकानदारांचे लोंखडी ठेले असल्याने डीपी ची आग विझविण्यास नागरिकांना चांगलीच कसरत करून माती, रेती व पाणी मारून पर्यंत प्रथमत: जागरूक नागरिकांनी केला. काही वेळाने कन्हान विद्युत अभियंता ओमकार सर आपल्या कर्मचाऱ्यासह पोहचले. नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांनी नगरपरिषदेचा पाणी टॅंकर बोलावुन विधृत कर्मचारी, नागरिकांनी पाणी मारून डीपी व आजुबाजुला लागलेल्या आगीला पुर्णत: विझवुन आगीवर नियत्रंण मिळविले.


या महामार्गा लगत ट्रान्सफार्म च्या अगदी सामोर दोन लोखंडी दुकानाचे ठेले लागले असल्याने तसेच नालीवर दुकानदार कचरा टाकत असल्याने या डीपी मध्ये बिघाड झाल्यास विद्युत कर्मचाऱ्यांना दुरूस्ती करिता जाताना रात्री किवा दिवसा सुध्दा चांगलीच कसरत करावी लागते. यामुळे नगरपरिषद प्रशासनाने या माहामार्गा लगत फुटपाथवरील वाढणाऱ्या अतिक्रमण काढुन अंकुश लावण्यात यावा. तसेच महामार्गा लगत व शहरात होणाऱ्या जुन्या नविन बांधकामावर कुणाचे नियंत्रण नसल्याने शहरात अवैद्य बांधकामाचे दिवसेन दिवस प्रमाण वाढुन नागरिकांनाच त्रास होऊन भाडण, तंटे वाढुन नगरपरिषदे ला हे अतिक्रमण तोडण्याची डोके दुखी होणार असल्याने नगरपरिषदेच्या संबधित विभागाचे अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून तत्परता दाखवावी अशी मागणी नागरिकांच्या चर्चेतुन सामोर येत आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …