*वेकोलि सुरक्षा अधिकारी व कन्हान पोलीसाची अवैद्य कोळसा टाल वर धाड* *२१ टन कोळसा किंमत एकुण ८४ हजार रुपय चा मुद्देमाल जप्त , दोन आरोपी विरुद्ध कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल*

*वेकोलि सुरक्षा अधिकारी व कन्हान पोलीसाची अवैद्य कोळसा टाल वर धाड*

*२१ टन कोळसा किंमत एकुण ८४ हजार रुपय चा मुद्देमाल जप्त , दोन आरोपी विरुद्ध कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस ९ कि मी अंतरावर भाटीया कोलवासरी च्या मागे वराडा शिवार येथे अवैद्य कोळसा टाल वर वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी व कन्हान पोलीस यांनी संयुक्त धाड मारून २१ टन कोळसा किंमत ८४००० रूपयाचा जप्त करून कन्हान पोस्टे ला फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार (दि.१) जुन ला मध्य रात्री १२.४५ वाजता दरम्यान वेकोलि कामठी उपक्षेत्र खुली कोळसा खदान सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे हे सुरक्षा रक्षका सह पेट्रोलिंग करित असताना फोन वर गुप्त माहिती मिळाली की, वराडा शिवारातील इंदर कॉलरी डंपिग यार्ड आणि भाटीया कोलवाशरी मागे अवैद्य कोळसा टालवर चोरीचा कोळसा ठेवलेला आहे . अशी माहिती मिळताच सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे, सुरक्षा रक्षक, एमएसएफ चे जवान कर्मचारी व कन्हान पोलीस यांनी संयुक्त घटनास्थळी धाड मारून कोळस्याचा ढिगारा जप्त करून कोळसा हा पे लोडर च्या साह्याने ने ट्रक मध्ये भरून त्याचे वजन २१ टन ३०० किलो भरले . ४,००० रूपये प्रति टन प्रमाणे एकुण किंमत ८४,२०० रूपयाचा मुद्देमाल कोळसा कोल डेपो मध्ये जमा करण्यात आला. आणि फिर्यादी रवि कांतकंडे यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी कोळसा चोर फारुख अब्दुला शेख व अभिषेक उर्फ चिंटु सिग यांच्या विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी फारूख अब्दुला शेख यांचे वर कोळसा चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याने कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …