*स्ट्रीट लाईटच्या खांबाला करंट, मुलगी थोडक्यात वाचली तर दोन डुक्कराचा करंट लागुन मृत्यु*
*त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी*
*भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा (ग्रा) उपाध्यक्ष रिंकेश चवरे यांचे नगरपरिषद मुख्याधिकारी ला निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.५ धरमनगर कन्हान येथील स्ट्रीट लाईट खांबाला करंट येत असुन जवळच्या घरची एक लहान मुलगी थोडक्यात वाचली. तर दोन डुक्करांचा या खांबाचा विद्युत शॉक लागुन मुत्यु झाल्याने नगरपरिषद प्रशासनाने या विद्युत खांबाची त्वरित दुरूस्ती करावी. अन्यथा होणाऱ्या जिवित हानीस नगरपरिषद शासन , प्रशासन जिम्मेदार राहील. अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा (ग्रा) उपाध्यक्ष रिंकेश चवरे हयानी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.५ धरमनगर कन्हान येथील स्ट्रीट लाईट खांबाला करंट येत असुन बुधवार (दि.१८) मे ला जवळच्या घराची एक लहान मुलगी थोडक्यात वाचली. तर दोन डुक्करांचा या विद्युत दिवे खांबाचा विद्युत शॉक लागुन मुत्यु झाला. धरमनगर येथील स्ट्रीट लाइट लावल्या पासुन काही स्ट्रीट लाईट बंद आहेत तर काही सुरू आहेत. शुरू असलेल्या पैकी काही स्ट्रीट लाईट खांबाला करंट आहे. यामुळे सामोर पावसाळयाचे दिवस असल्याने सर्व स्ट्रीट लाईट खांबाची वायरिंग तपासुन येणारा करंट दुरूस्ती करावा. या समस्येकडे येथील नगरसेवक, नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करित आहे. नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांचे घर अवघ्या १५० मीटर असुन ५ ते ६ दिवस लोटुन संबधितानी येऊन सुध्दा पाहीले नाही . यास्तव येथील नागरिकांच्या वतीने भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा (ग्रा) उपाध्यक्ष रिंकेश चवरे यांनी मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे नगरपरिषद कन्हान यांना विद्युत खांबाची त्वरित दुरूस्ती करावी. अन्यथा होणाऱ्या जिवित हानीस नगरपरिषद शासन , प्रशासन जिम्मेदार राहील. असे निवेदन देऊन ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली असुन प्रतिलिपी कन्हान पोलीस स्टेशन ला देण्यात आली आहे .