*वराडा येथुन फिर्यादी यांच्या घरासमोरुन रात्री स्पेंलडर दुचाकी वाहन चोरी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस सात कि मी अंतरावर वराडा शिवारात सुरज तांदुळकर यांच्या घरासमोर लाॅक लावुन ठेवलेली दुचाकी वाहन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सुरज गोपाल तांदुरकर वय २८ वर्ष रा. वराडा यांनी आपली दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० सीबी ५५२० आपल्या घरासमोर हॅंन्डल ला लाॅक लावुन उभी ठेवली असता गुरूवार (दि.२) जुन २०२२ ला १:३० ते ५:३० वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने दुचाकी वाहनाचे हॅंन्डल चे लाॅक तोडुन ७०,००० रूपये किमतीची दुचाकी वाहन स्पेंलडर चेसेस नंबर एमबीएलएचएडब्लु ११३१५१०२२५२ इंजन नंबर एचए११इवीएल५के२२१४८ चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी सुरज तांदुरकर यांच्या तोंडी तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.